Family Savings Decline In India :
भारतीय कुटुंबांच्या निव्वळ बचतीचा आकडा 4 टक्क्यांनी घटला
अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत भारतीय कुटुंबांच्या निव्वळ बचतीचा आकडा सुमारे 4 टक्क्यांनी घसरला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात तो GDP च्या 5.1 टक्के राहिला आहे. तर 2020-21 मध्ये हाच आकडा 11.5 टक्के होता. सध्या ते 7 ते 7.5 टक्क्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा खूपच खाली गेले आहे. भारतातील लोक आता रिअल इस्टेट आणि वाहने खरेदीवर जास्त पैसे खर्च करत आहेत. त्यामुळे त्यांचे कर्ज वाढले आहे. तरीही भारतीयांची कर्ज फेडण्याची क्षमता जगातील मोठ्या देशांपेक्षा आजही जास्त आहे.
बचत मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्यासाठी बचतीचा वापर
बचतीमधील रक्कम घटत असल्याने भारतीय कुटुंबे कठीण काळात अडचणीत येऊ शकतात. मात्र, तरीहीदेखील कर्ज घेण्याकडे कल वाढत आहे. त्यांची आर्थिक दायित्वे 2022-23 या आर्थिक वर्षात GDP च्या 5.8 टक्क्यांवर पोहोचली आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात हा आकडा 3.8 टक्के होता. मात्र, रिझव्र्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या विश्लेषणानुसार बचतीतील घसरणीचा आकडा सध्या स्थिर आहे. याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. भारतीय कुटुंबे मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्यासाठी त्यांच्या बचतीचा वापर करत आहेत.
भारताचे Debt-Service गुणोत्तर मार्चमध्ये 6.7 टक्के
अहवालानुसार, मार्च 2023 मध्ये भारताचे Debt-Service Ratio हे 6.7 टक्के होते. हाच आकडा अमेरिकेत 7.8 टक्के, जपानमध्ये 7.5 टक्के, ब्रिटनमध्ये 8.5 टक्के, कॅनडामध्ये 14.3 टक्के आणि कोरियामध्ये 14.1 टक्के होता. या बाबतीत भारताची स्थिती जगातील अनेक देशांपेक्षा चांगली आहे.
Debt-Service गुणोत्तर म्हणजे कर्जदाराकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा निधी, पैसे आहेत का हे या गुणोत्तरावरून समजते.