Investment Tips :  भारतात अनेकांना चहाचे व्यसन असते. दिवसाची सुरुवात चहाने होते आणि रात्रीपर्यंत चहाचे प्याला रिचवला जातो. कधी कंटाळा आलाय, काही काम नाही अशा विविध कारणांनी चहासाठी ब्रेक घेतला जातो. अतिप्रमाणात चहा पिणे अपायकारक आहे, हे सांगितले तरी अनेकजण चहाची साथ सोडत नाही. मात्र, याने आरोग्यावर परिणाम होतो, शिवाय आर्थिक परिणामही होतो. तुम्ही दोन वेळचा चहा सोडला तरी तुम्ही करोडपती होऊ शकता. 


सध्या देशात एक कप चहा किमान 10 रुपयांना मिळतो. एक सामान्य माणूस दिवसातून दोनदा चहा नक्कीच पितो. म्हणजेच तो दररोज चहावर किमान 20 रुपये खर्च करतो. काही लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात. घरी चहा तयार करून प्यायल्यास साखर, चहाची पाने आणि दूध यावर खूप पैसा खर्च होतो. 


पण नवीन वर्षापासून चहा पिणे बंद करण्याचा संकल्प तुम्हाला करोडपती करू शकतो. आरोग्यासोबतच आर्थिक स्थितीही सुधारेल. 'थेंबे थेंबे, तळे साचे' अशी एक म्हण आहे. तुम्ही चहावर खर्च केलेली रक्कम वाचवली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. पण, हे कसे शक्य आहे? जाणून घ्या. 


करोडपती कसे व्हाल?


तुम्ही चहावर किमान 20 रुपये म्हणजे महिन्याला 600 रुपयांचा खर्च करता. हाच पैसा वाचवून तुम्ही चांगला निधी उभारू शकता. सध्याच्या काळात अनेकांना म्युच्युअल फंडबाबत माहिती आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला दरमहा गुंतवणूक करण्याची संधी मिळते. तुम्ही चहाचे पैसे एसआयपी मध्ये गुंतवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा तुम्हाला परतावा मिळू शकतो. काही फंड्सने तर 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 


म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीने उद्दिष्ट साध्य करता येईल


वयाच्या 20 व्या वर्षी जर एखाद्या तरुणाने दररोज 20 रुपयांची आणि महिन्याला 600 रुपये वाचवून ही रक्कम एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 


40 वर्षे  म्हणजे 480 महिने सतत दरमहा 10 कोटींहून अधिक रक्कम जमा होऊ शकते. 


तुम्ही करत असलेल्या या गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक परतावा 15 टक्के असेल तर 40 वर्षांनंतर एकूण निधी 1.88 कोटी रुपये होतो. या 40 वर्षांमध्ये गुंतवणूकदार फक्त 2,88,00 रुपये जमा करतील. जर तुम्हाला दरमहा 600 रुपयांच्या SIP वर 20 टक्के परतावा मिळत असेल तर 40 वर्षांनंतर एकूण 10.21 कोटी रुपये जमा होतील.


याशिवाय 30 वर्षांच्या तरुणाने दररोज 30 रुपये वाचवले, जे महिन्याला 900 रुपये होतात. जर त्याने ही रक्कम म्युच्युअल फंडात SIP द्वारे 30 वर्षांसाठी गुंतवली आणि वार्षिक 10 टक्के गुंतवणूक वाढवली, तर त्याला एकूण 1.35 कोटी रुपये मिळतील. हा अंदाज 15 टक्के वार्षिक परताव्यावर आधारित आहे. म्हणजेच वयाच्या 30 व्या वर्षापासून मासिक 900 रुपये गुंतवून वयाच्या 60 व्या वर्षी करोडपती बनणे शक्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही चहाची सवय सोडून करोडपती होण्याचा मार्गही निवडू शकता. म्युच्युअल फंडामध्ये चक्रवाढ व्याज मिळाल्याने, एक छोटी गुंतवणूक देखील दीर्घ मुदतीसाठी एक मोठा फंड बनते.


(Disclaimer : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारीत असतात. त्यामुळे म्युच्युअल  फंडमधील गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)