Indias Exports News : भारतातील सेवा क्षेत्र (Service Sector) पुढील काही वर्षांत विक्रम करु शकते. त्यासाठी सरकारनं (Govt) तयारी देखील केली आहे. यासाठी सरकारनं 83.78 लाख कोटी रुपयांची योजनाही तयार केली आहे. सरकारने 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 83.78 लाख कोटी रुपये निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या निर्यातीत ऑगस्ट महिन्यात सलग दुसऱ्या महिन्यात घसरण होत आहे. या कालावधीत निर्यात 9.3 टक्क्यांनी घसरून 34.71 अब्ज डॉलर झाली तर व्यापार तूट 29.65 अब्ज डॉलरवर 10 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला 83.78 लाख कोटी रुपये निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी सरकारनं योजना आखली आहे.
'या' क्षेत्रांवर सरकारचं लक्ष
देशातून सेवा क्षेत्राची निर्यात वाढवण्यासाठी वाणिज्य मंत्रालय 12 प्रमुख क्षेत्रांवर अधिक लक्ष देण्याची योजना आखत आहे. यामुळं एकूण निर्यातीचे आकडे सुधारण्यास मदत होणार आहे. दरम्यान, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सेवा क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सरकारचे 12 सेवा क्षेत्रावर विशेष लक्ष आहे. सेवा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (IT), पर्यटन, आरोग्यसेवा, शिक्षण, वाहतूक, लेखा आणि बांधकाम आणि संबंधित अभियांत्रिकी सेवांचा समावेश आहे. 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सच्या वस्तू आणि सेवा निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे साध्य करण्यात सेवा निर्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जागतिक संघर्षांचा या क्षेत्रावर जितका परिणाम होतो तितका मालावर होत नाही. किंबहुना, सध्याच्या जागतिक परिस्थितीत देशाच्या वस्तू निर्यातीवर नकारात्मक परिणाम होत आहे.
13 महिन्यात निर्यात खालच्या पातळीवर
जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळं, देशाच्या निर्यातीत ऑगस्टमध्ये 13 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली. या कालावधीत निर्यात 9.3 टक्क्यांनी घसरून 34.71 अब्ज डॉलर झाली आहे. तर व्यापार तूट 29.65 अब्ज डॉलरवर 10 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर गेली आहे. वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोने आणि चांदीच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळं देशाची आयात 3.3 टक्क्यांनी वाढून 64.36 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. दरम्यान, येमाऱ्या काळात भारत देशाची निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे असून, देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या: