India to resume international flights service : नाताळ आणि नवीन वर्षानिमित्ताने परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे. भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना महासाथ ओसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. 


या देशात विमान सेवा नाही 


15 डिसेंबरपासून ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स. फिनलँड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे आणि न्यूझीलँड सह 14 देशांना वगळता इतर देशांसाठी नियमितपणे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या 14 देशांमध्ये अनेक देशांमध्ये एअर बबल करारातंर्गत विमान सेवा सुरू आहे. 


मार्च 2020 पासून स्थगिती


भारतात कोरोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर 'वंदे भारत' विमान सेवा आणि कोविड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली. ज्या 14 देशांमध्ये नियमितपणे विमानसेवा सुरू करण्यात आली नाही. त्यादेशांमध्ये बबल करारानुसार आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यवसाय ठप्प असल्याने विमान कंपन्या अडचणी सापडल्या होत्या.


लसीकरणाचे वाढते प्रमाण


डिसेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे प्रमाण वाढणार आहे. देशात 40 टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत


विमानसेवा सुरू 


आंतरराष्ट्रीय विमान सेवेप्रमाणे देशांतर्गत विमानसेवाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यानंतर देशांतर्गत विमान सेवा काही नियम आणि निर्बंधासह पुन्हा सुरू करण्यात आली. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण क्षमतेसह विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे


लस घेतली तरीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक, WHO चं आवाहन


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA