vaccinated should wear masks and physically distance : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लसीचे दोन डोस घेतले असले तरीही मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे अनिवार्य आहे, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.  सुट्टीच्या काळात संपूर्ण युरोपमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. लस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे लसीकरण झालं असले तरीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.  


WHO चे संचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी बुधवारी जिनिव्हा येथे पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी लोकांना सावध होण्याचा सल्ला दिलाय. तसेच कोरोनाचं संकट अद्याप संपलं नसल्याचेही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ‘काही देश आणि विशिष्ट समुदायांकडून लस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका संपला असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, ते खोटं अश्वासन देत आहेत. लसीकऱण पूर्ण झालं असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे.’ पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘लस घेतेल्या लोकांना कोरोनापासून होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी आहे. परंतु, लसीकरण झालेल्यांपासून कोरोना महामारीचा प्रार्दुर्भाव वाढू सकतो. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस घेतली तरीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावेच. जेणेकरुन आपल्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. ‘


तुम्ही लसवंत झाला असलात तरीही, स्वत:ला दुसऱ्यांपासून संसर्ग होऊ नये, अथवा आपल्यामुळे इतर कुणाला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क परिधान करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, सोशल डिस्टन्सिंगचा वापर कऱणे, शक्य असल्यास भेटीगाठी टाळाव्यात. एखाद्याची भेटायचेच असेल तर मोकळ्या जागेत भेट घ्यावी, असे टेड्रोस म्हणाले. यावेळी बोलताना टेड्रोस यांनी युरोपला सध्याचा "कोरोना साथीच्या रोगाचा केंद्रबिंदू" म्हटले आहे. याविरोधात युरोपातील नागरिकांनी आणि आरोग्य व्यवस्थेनं एकत्रपणे लढलं पाहिजे, असेही ते म्हणाले. 21 नोव्हेंबर रोजीच्या नवीन आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्यापैकी 67 टक्के रुग्ण एकट्या युरोपमधील आहे. या कालावधीत युरोपमध्ये 2.4  दशलक्षाहून जास्त जणांना संसर्ग झालाय. मागील सात दिवसांच्या तुलतेन ही संख्या 11 टक्केंनी वाढली आहे.