नवी दिल्ली : भारतानं रशियाकडून तेलखरेदी केल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. या दरम्यान भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत होत असताना दिसत आहे. रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव या महिन्यात भारताचा दौरा करु शकतात. पात्रुशेव कृषी क्षेत्राचे जाणकार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतातून झींगा आणि रासायनिक खतांची आयात वाढवणे हा आहे. भारत अमेरिकेला सर्वाधिक झींगा सर्वाधिक निर्यात करतो. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टॅरिफ लावल्यानंतर या निर्यातीवर परिणाम झाला आहे. आर्थिक जाणकारांच्या मते रशिया भारतीय झींगा निर्यातदारांसाठी आकर्षक बाजार बनला आहे.
पात्रुशेव भारत दौऱ्यावर का येणार? (Patrushev India Tour)
रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव हे भारतातील प्रमुख मंत्र्यांची भेट घेऊ शकतात. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध मजबूत करणे हा त्यामागील उद्देश असेल.अमेरिकेला भारताकडून सर्वाधिक झींगा निर्यात केला जातो. याची वार्षिक उलाढाल अब्जावधी डॉलर्सची आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं झींगा व्यापारावर परिणाम झाला आहे. भारतीय झींगा निर्यातदारांना अमेरिकेच्या बाजारात आता इक्वाडोर, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि चीनसोबत स्पर्धा करावी लागेल. त्या पार्श्वभूमीवर रशियासोबतचा व्यापार दिलासा देणारा ठरु शकतो.
अमेरिकेचं टॅरिफद्वारे दबावाचं राजकारण
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं भारतानं रशियाकडून तेलखरेदी सुरु ठेवल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. भारताच्या झींगा निर्यातीवर अमेरिका आयातशुल्क म्हणून 58 टक्के टॅरिफ आकारु शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जी-7 देशांनी देखील भारतावर टॅरिफ लावलं जावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. शुक्रवारी झालेल्या जी-7 च्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत अमेरिकेनं भारत आणि चीनवर टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
भारताची भूमिका काय?
अमेरिकेच्या आरोप हा आहे की भारतानं रशियाकडून खरेदी करुन यूक्रेन विरूद्धच्या युद्धात पुतिन यांना फंडिंग केलं. भारतानं या आरोपांना फेटाळत असताना ते अयोग्य आणि न्यायकारक असल्याचं म्हटलं. भारतानं आपलं धोरण राष्ट्रहित, बाजारातील स्थिती आणि ऊर्जा सुरक्षेसाठी योग्य ठरवलं आहे.
दरम्यान, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं तणावाचे बनले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापारी कराराचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टला नरेंद्र मोदी यांनी देखील सकारात्मक संकेत दिल्यानं त्याचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.