Retirement Income Systems : जागतिक पेन्शन निर्देशांक जाहीर झाला आहे. यामध्ये भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे समोर आले आहे. जागतिक पेन्शन निर्देशांकांतील भारताचे स्थान एकूण तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जागतिक पेन्शन निर्देशांकांमधील 47 देशांच्या यादीत भारताचा 45 वा क्रमांक लागतो. 


सेवानिवृत्तीनंतर देशातील अनेक वृद्धांना त्यांच्या छंदांसाठी वेळ देणे आवडते. काही जणांना असे वाटते की विश्रांतीचे क्षण कुटुंबासोबत घालवले पाहिजेत. याच संदर्भातील एक जागतिक पेन्शन निर्देशांक जाहीर झाला आहे. यामध्ये 47 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 45वा आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतातील सेवानिवृत्ती प्रणालीमध्ये काही सुधारणा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र तरीही, सेवानिवृत्ती उत्पन्न प्रणाली विश्लेषणानुसार 47 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 45 वा आहे. त्यामुळं या अहवालानुसार भारताची कामगिरी चांगली आहे असं म्हणता येणार नाही. 2022 मध्ये भारताला 44.5 ते 45.9 असे एकूण निर्देशांक मूल्य मिळाले. ज्यामुळे 47 देशांच्या सेवानिवृत्ती उत्पन्न स्थितीच्या विश्लेषणात देशाला 45 वे स्थान मिळाले. स्थिरता आणि कार्यक्षमतेच्या क्षेत्रात घसरणाऱ्या उप-निर्देशांकांच्या स्थितीत सुधारणा झाल्यामुळे हा आकडा दिसून आला आहे.


जागतिक पेन्शन निर्देशांकातं कोणता देश अव्वल? 


जागतिक पेन्शन निर्देशांकांच्या यादीत नेदरलँड अव्वल स्थानावर आहे. एकूण निर्देशांक मूल्य 85 आहे. यानंतर आइसलँड 83.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. डेन्मार्कचा स्कोअर 81.03 असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. अर्जेंटिना या यादीत सर्वात खालच्या स्तरावर आहे आणि त्याचा स्कोअर 42.3 आहे.


तीन नवीन सेवानिवृत्ती उत्पन्न प्रणाली देखील समाविष्ट


या वर्षी, ग्लोबल पेन्शन इंडेक्सने जगभरातील 47 सेवानिवृत्ती उत्पन्न प्रणालींची तुलना केली आहे. यामध्ये जगातील 64 टक्के लोकसंख्येचा समावेश केला. बोत्सवाना, क्रोएशिया आणि कझाकस्तान या 2023 च्या ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये तीन नवीन सेवानिवृत्ती उत्पन्न प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे.


ग्लोबल हंगर इंडेक्समध्येही भारताची घसरण


ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) जारी करण्यात आला आहे. यामध्ये भारताची 111 व्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताचा  स्कोअर हा 28.7 टक्के आहे. यावेळी भारताची पाकिस्तानसह बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेनं बगल काढली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.


भारताची 111 व्या स्थानावर घसरण


ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताची स्थिती बिकट झाली आहे. 125 देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 111 व्या स्थानावर आला आहे. इतकेच नाही तर सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे प्रमाण तसेच बालकांच्या कुपोषणातही भारत आघाडीवर आहे. 2022 सालापासून भारताची स्थिती आणखी बिकट झाली आहे. गेल्या वर्षी भारत या निर्देशांकात 107 व्या क्रमांकावर होता. यावर्षी त्यामध्ये आणखी घसरण झाली असून, भारताची  111 व्या स्थानावर घसरण झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर, भारत कितव्या स्थानी? पाकिस्तानसह बांगलादेश आणि श्रीलंका भारताच्या पुढे