India Gold Import : भारतात (India) मोठ्या प्रमाणात सोन्याची उलाढाल होते. सोने आयातीत (Gold Import) देखील भारताचा वरचा क्रमांक लागतो. सोने हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) दृष्टीनं महत्वाचा घटक आहे. त्यामुळं अनेक देशातून भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते. चीन नंतर भारत हा दुसरा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेला देश आहे. दरम्यान, भारत सर्वात जास्त सोन्याची आयात कोणत्या देशातून करतो? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.   


2023-24 या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत मोठी वाढ


भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याचा वापर केला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होत असते. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सोने हा महत्त्वाचा घटक आहे.  दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत मोठी वाढ झालीय. ही आयात 30 टक्क्यांनी वाढून 45.54 अब्ज डॉलर झाली आहे. 2022-23 ची तुलना केली तर ही आयात खूप कमी होती. 2022-23 मध्ये सोन्याची आयात ही 35 अब्ज डॉलर इतकी होती. सोन्याच्या आयातीचा परिणाम थेट महागाईवर होत असतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सोने आयातीचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम होत असतात.


या देशातून भारत करतो सर्वाधिक सोन्याची आयात?


तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, कोणत्या देशातून भारतात सर्वाधिक सोन्याची आयात होते? तर वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडमधून भारतात सर्वात जास्त सोन्याच्या आयात केली जाते. स्वित्झर्लंडचा वाटा हा 40 टक्के आहे. तर दुसा क्रमांक हा संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) लागतो. या देशातून 16 टक्के सोन्याची आयात भारतात केली जाते. तर दक्षिण आफ्रिकेचा वाटा सुमारे 10 टक्के आहे.


एकूण आयातीत सोने आयातीचा वाटा हा पाच टक्के


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एकूण आयातीत सोने आयातीचा वाटा हा पाच टक्के आहे. सध्या सोन्यावर 15 टक्क्यांचं आयात शुल्क आहे. सोन्याच्या आयातीत वाढ होऊनही मागीव वर्षी व्यापारी तूट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्याच्या घडीला सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या सोन्याचे दर हे 73,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली झालीय. 


दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ


दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत आहे. ही वाढ झाल्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. सध्या एका बाजूला लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. तर दुसऱ्या बाजुला सोन्याच्या दरातील वाढ काही थांबत नाही. त्यामुळं सोन्याची खरेदी करावी कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सोने खरेदीची सुवर्णसंधी! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज सोन्या चांदीचा दर काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर