Fish Export News : माशांच्या निर्यातीच्या भारताने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंत भारताने सीफूड निर्यातीतून 60,523.89 कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये कोळंबीच्या विक्रीतून भारताने सर्वात मोठे कमाई केली आहे. एकूण निर्यातीपैकी जवळजवळ दोन तृतीयांश आहे. भारतीय सागरी उत्पादनांची गुणवत्ता आणि वाढती मागणी यामुळे अमेरिका आणि चीनसारख्या देशांनी भारतीय समुद्री खाद्यपदार्थ घेतले आहेत.
1.78 दशलक्ष टन सीफूडची निर्यात
सरकारी आकडेवारीनुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने एकूण 1.78 दशलक्ष टन सीफूडची निर्यात केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 2.67 टक्के अधिक आहे. भारतीय सागरी उत्पादने केवळ ताजेपणा आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध नाहीत तर त्यांची मागणी सतत वाढत आहे. भारतीय माशांना परदेशात मोठी मागणी आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात देशातून माशांची निर्यात केली जाते. याचा मोठा फायदा देशाला होत आहे. त्यामुलं मत्स्यपालन क्षेत्राला सरकारनं आणकी प्रोत्साहन देण्याची मागणी देखील केली जातेय.
सरकारी धोरणे आणि सीमाशुल्क कपातीचा परिणाम
सीफूड निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. विशेषत: कोळंबी आणि मत्स्य खाद्य उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांवरील सीमा शुल्क (बीसीडी) 5 टक्के करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, ब्रूडस्टॉक आणि पॉलीचेट वर्म्सवर कर सूट देण्यात आली आहे. याशिवाय क्रिल मील, फिश ऑइल आणि अल्गल प्राइम (पीठ) यांसारख्या निविष्ठांवरील करही कमी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायूपासून बनवलेल्या सिंगल सेल प्रोटीन आणि कीटकांच्या अन्नावरही कर कमी करण्यात आला आहे. ही सर्व पावले मत्स्यपालन उद्योगाला बळकट करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धात्मक ठेवण्यासाठी उचलण्यात आली आहेत.
अमेरिका आणि चीन हे सर्वात मोठे खरेदीदार
2024-25 या आर्थिक वर्षात युनायटेड स्टेट्स भारताचा सर्वात मोठा सीफूड आयातदार म्हणून उदयास आला आहे. अमेरिकन बाजारपेठेत ज्या विशिष्ट माशांना सर्वाधिक मागणी होती ती फ्रोझन कोळंबी होती. जी अमेरिकेच्या एकूण आयातीपैकी 91.9 टक्के होती. भारतीय सीफूडच्या एकूण निर्यातीपैकी 34.53 टक्के अमेरिकेने खरेदी केली. त्याचवेळी या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार होता. चीनने US1.38 अब्ज डॉलर किंमतीचे 451,000 मेट्रिक टन सीफूड आयात केले आहेत. त्याचबरोबर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर व्हिएतनाम, थायलंड, कॅनडा, स्पेन, बेल्जियम, यूएई आणि इटली या देशांनीही मोठ्या प्रमाणात भारतीय सीफूड आयात केले आहे.