Crude Oil News: भारत (India) आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. जगातील अन्य देशांकडून भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची (crude oil) आयात होते. गेल्या काही काळापासून भारताला रशियाकडून (russia) स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होत होता. मात्र, आता आणखी एक देश भारताला स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. रशियानंतर आता भारताला व्हेनेझुएलातून (venezuela) स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होऊ शकतो.
व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त तेलाचा साठा
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून भारताला रशियाकडून भरपूर मदत मिळत होती. स्वस्त दरात मिळत आहे. रशियानंतर आता व्हेनेझुएला देखील भारतासाठी स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. रशियानंतर आता भारताला व्हेनेझुएलातून स्वस्त दरात कच्चे तेल मिळू शकते. अमेरिकेच्या धोरणांमधील ताज्या बदलामुळं याचा मार्ग खुला झाला आहे. त्यांच्या आर्थिक निर्बंधांमुळे व्हेनेझुएला आपले कच्चे तेल विकू शकली नाही. आत्तापर्यंत सापडलेल्या तेलाच्या साठ्यानुसार व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त तेलाचा साठा आहे.
अमेरिकेने लावलेले आर्थिक निर्बंध कमी केले
तेलाचे सर्वाधिक साठे असूनही व्हेनेझुएलातील परिस्थिती चांगली नाही. व्हेनेझुएला अशा देशांपैकी एक आहे जिथे चलनवाढ सध्या जगात सर्वाधिक आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळं देश दीर्घकाळ राजकीय अस्थिरतेच्या काळात गेला आहे. व्हेनेझुएलाच्या आर्थिक संकटासाठी अमेरिकेने लादलेले निर्बंध कारणीभूत होते. ज्यामुळं व्हेनेझुएला आपले कच्चे तेल विकू शकले नाही. आता अमेरिकेने आपली धोरणे बदलली आहेत, त्यामुळं व्हेनेझुएलासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्याचा मार्ग खुला आहे.
भारत हा तिसरा सर्वात मोठा आयातदार
दोन आठवड्यांपूर्वी भारताने व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत हा आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला 80 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल इतर देशांकडून खरेदी करावे लागते. याच कारणामुळे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे.
इतकी सूट मिळू शकते
गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने सवलतीच्या दरात कच्चे तेल विक्री करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून भारत रशियाकडून सातत्यानं स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे. व्हेनेझुएलाचे कच्चे तेल भारतासाठी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियाच्या तुलनेत व्हेनेझुएला 10 टक्के अतिरिक्त सवलत देऊ शकते असे सांगितले जात आहे.
भारतीय कंपन्यांनी सुरू केलं काम
येत्या काही महिन्यात भारताला कच्च्या तेलाचे आयात बिल आणखी कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. भारतीय रिफायनर कंपन्यांनी व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. आजकाल, यामुळं, व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमधील लक्झरी हॉटेल्समध्ये वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: