Mumbai Crime News: मुंबई (Mumbai News) पुन्हा एका धक्कादायक घटनेनं हादरली आहे. मुंबईत एका महिला डॉक्टरवर बलात्कार (Crime News) झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी (Mumbai Police) आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पीडितेनं स्वतः घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.        


पीडित महिलेनं यासंदर्भात स्वतः पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल करून पैसे घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यानं पीडितेकडे आणखी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना, आरोपी आणि महिलेची ओळख झाली आणि दोघांची मैत्रीही झाली, दोघांमध्ये बोलणं सुरू झालं.     


महिला विवाहित असून काही घरगुती कारणांमुळे पतीसोबत राहत नसून एकटी राहत होती. याचा फायदा घेत आरोपीनं महिलेला या विषयावर तोडगा काढू असं सांगून तिला भेटायला बोलावलं. महिलेनं दिलेल्या जबाबानुसार हे दोघं एकत्र भेटले आणि आरोपीनं महिलेला वाईन देऊन त्यामध्ये काही पदार्थ टाकले, त्यानंतर महिला बेशुद्ध झाली. याचाच फायदा घेत आरोपीनं महिलेवर बलात्कार केला.   


या घटनेनंतर आरोपीनं महिलेकडे पैसे मागायला सुरुवात केली, महिलेनं पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवार धमकी देत आरोपीनं ​​महिलेकडून लाखो रुपये उकळले. मात्र, हे चुकीचं असल्याचं महिलेला वाटलं आणि तिनं तात्काळ पोलिसांत धाव घेतली. तिनं पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.


नेमकं काय घडलं? 


घटना 20 ऑगस्ट रोजीची आहे. आरोपीनं पीडितेला एका क्लबमध्ये बोलावलं. दरम्यान, क्लबमध्ये गेल्यानंतर आरोपीनं पीडितेला जबरदस्तीनं (Crime News) वाईन पाजली. त्या वाईनमध्ये आरोपीनं काहीतरी मिसळलं होतं. वाईन प्यायल्यानंतर काही वेळातच महिला बेशुद्ध झाली. नंतर त्यानं पीडितेला कारमधून आपल्या घरी नेलं. तिथे गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले आणि त्याच्याच आधारे महिलेला वारंवार ब्लॅकमेल करू लागला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Navi Mumbai Crime News: फेसबुकची एक पोस्ट, 2 तासांत कर्ज; पण बँक अकाउंटमधून 90 हजार रुपये भुर्रर्रर्र, नेमकं काय घडलं?