Lentils Price Hike: भारत आणि कॅनडा (india canada) या दोन देशातील संबंधांमध्ये दिवसेंदिवस दरी येत असल्याचं चित्र दिसत आहे. भारत कॅनडातून मोठ्या प्रमाणात मसूरची (Lentils) आयात करतो. मात्र, सध्या कॅनडातून भारतात होणाऱ्या मसूरीच्या आयातीत घट झाली आहे. त्यामुळं मसूर डाळीच्या दरातही वाढ (Lentils Price Hike) होताना दिसत आहे.
भारत कॅनडातून मोठ्या प्रमाणावर मसूरची आयात करतो. पण खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत कॅनडातील भारतीय एजन्सींचा हात असल्याचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर कॅनडाने भारताला मसूर विकण्याचा वेग मंदावला आहे. भारत सरकार व्यापारावर निर्बंध लादू शकतो की काय अशी तिथल्या व्यावसायिकांना भीती वाटते.
भारत मसूरच्या आयातीवर अवलंबून
भारतात पौष्टिक आहारात मसूराचा वापर केला जातो. भारत मसूरच्या आयातीवर अवलंबून आहे. भारत कॅनडातून मोठ्या प्रमाणावर मसूर आयात करतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील तणावामुळे दोन्ही सरकारे व्यापारावर निर्बंध आणू शकतात, अशी भीती व्यावसायिकांना वाटत आहे. ओलम अॅग्री इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन गुप्ता म्हणाले की, अशा प्रकारच्या भीतीमुळे व्यावसायिकांना त्रास होत आहे. एकाा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे अशी कोणतीही योजना नाही आणि सरकारने आयातदारांना अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. कॅनडाने देखील आपल्या बाजूने असा कोणताही निर्णय घेत नाही. ज्यामुळं दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडू शकतात.
कॅनडातून मसूरच्या निर्यातीचा पुरवठा कमी
मसूराच्या उत्पादनात घट झाल्यानंतर 2023 मध्ये भारताने कॅनडातून मोठ्या प्रमाणावर मसूर आयात केली आहे. आजपर्यंत आयात रद्द केल्याचे उदाहरण समोर आले नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. मसूर डाळीचे उत्पादन घटल्यानंतर दरात वाढ होताना दिसत आहे. पण कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर कॅनडातून मसूरचा पुरवठा सहा टक्क्यांनी कमी झाला आहे. 2022-23 मध्ये, कॅनडा हा भारताला मसूर पुरवठा करणारा सर्वात मोठा देश होता. 31 मार्च 2023 पर्यंत, भारताने कॅनडातून $370 दशलक्ष किमतीची 4.86 लाख मेट्रिक टन मसूर आयात केली आहे. जी भारताच्या एकूण आयातीच्या 50 टक्क्यांहून अधिक होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत कॅनडातून मसूर डाळ आयातीत 420 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून खरेदीत वाढ
भारतात दरवर्षी 2.4 दशलक्ष मेट्रिक टन मसूर वापरली जाते. तर देशांतर्गत उत्पादन केवळ 1.2 दशलक्ष मेट्रिक टन आहे. बाकी लागणारी मसून आयात केली जाते. दरम्यान, कॅनडातून मसूरची खरेदी कमी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियातून मसूर डाळीची खरेदी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: