Independence Day Sale Air Ticket Offer: आज देशभर मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा (Independence Day) उत्साह साजरा केला जात आहे. आजचा 15 ऑगस्टचा हा दिवस खास साजरा करण्यासाठी अनेक एअरलाईन्स कंपन्यांनी ग्राहकांना अनेक खास ऑफर्स दिल्या आहेत. 78 व्या स्वातंत्र्य दिनाला खास बनवण्यासाठी, स्टार एअरने (Star Air) इंडिपेंडन्स फ्रीडम सेल आणला आहे. या ऑफरचा लाभ घेण्याचा आजचा (15 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. या सेल अंतर्गत, व्यवसाय आणि इकॉनॉमी या दोन्ही वर्गातील लोकांना मोठ्या सवलतीचा लाभ मिळणार आहे. कमी खर्चात ग्राहकांचा विमानाने आरामदायी प्रवास होणार आहे. 


बिझनेस क्लासमध्ये फक्त 5555 रुपयांमध्ये प्रवास 


स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टार एअरने आपल्या ग्राहकांसाठी लक्झरी बिझनेस क्लाससाठी खास ऑफर आणली आहे. याअंतर्गत, प्रवाशांना फक्त 5555 रुपयांमध्ये आरामदायी बिझनेस क्लास सीट, उत्कृष्ट भोजन आणि वैयक्तिक सेवेचा लाभ घेता येईल. याशिवाय ग्राहकांना या सेलअंतर्गत इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करण्यावर विशेष सवलतीचा लाभही मिळत आहे. तुम्ही फक्त 1999 रुपयांमध्ये याचा लाभ घेऊ शकता. विशेष बाब म्हणजे या सेल अंतर्गत बुकिंग केल्याने तुम्हाला इकॉनॉमीमध्ये अधिक लेग रुमचा लाभही मिळेल.


या सवलतीचा लाभ 30 ऑक्टोबर दरम्यान केलेल्या बुकिंगसाठी वैध


5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या दरम्यान काळात ही सवलत देण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.  ही ऑफर फक्त 6 ऑगस्ट ते 30 ऑक्टोबर दरम्यान केलेल्या बुकिंगसाठी वैध आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासमध्ये स्वस्तात प्रवास करण्याचा लाभ घ्यायचा असणार आहे. 


विमान प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न


नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामुळे आता बोर्डिंग केल्यानंतर विमान टेक ऑफ करण्यास उशीर झाल्यासा प्रवाशांना विमाना बाहेर पडता येईल. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि विमानात चढल्यानंतर त्यांना जास्त वेळ बसावे लागणार नाही. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील देशांतर्गत हवाई वाहतूक वेगाने वाढत आहे आणि दररोज सुमारे 3,500 उड्डाणे जातात. BCAS आणि इतर प्राधिकरणांनी वाढत्या हवाई वाहतूक दरम्यान, विमानतळांवरील गर्दीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करत अनेक पावले उचलली आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Air Travel : विमान प्रवाशांसाठी दिलासा, आता लेट असलेल्या विमानात ताठकळत बसायची गरज नाही कारण..