Apple iphone Export News : भारतीय बाजारपेठ (India Market) परदेशी कंपन्यांना आकर्षित करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या गुंतवणूक (Investment) करत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर अनेक बड्या कंपन्यांनी चीनमधील (china) गुंतवणूक कमी केली आहे. त्यामुळं भारतीय बाजारेपेठेला फायदा होतोय. दरम्यान, भारतात सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचे (smartphone) उत्पादन केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात आयफोनची निर्यातीत दुपटीने (iPhone exports) वाढ झाली आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातून स्मार्टफोनची एकूण निर्यात 16.5 अब्ज डॉलर झाली आहे. ही परिस्थिती पाहता भारत स्मार्टफोन निर्मितीत भारताला टक्कर देत आहे. 


ॲपलपासून ते टेस्लापर्यंतच्या अनेक बड्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेचा मोठा फायदा


भारतात सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचे उत्पादन सुरु आहे. यामुळं निर्यातीत देखील वाढ झालीय. याचा मोठा फायदा देशाला होत आहे. ॲपलपासून ते टेस्लापर्यंतच्या अनेक बड्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेचा मोठा फायदा होतोय. मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातून परदेशात 12.1 अब्ज डॉलरच्या स्मार्टफोनची निर्यात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा हा आयफोनचा (iphone export) आहे.  मागील वर्षीच्या तलनेत ही वाढ मोठी आहे. मागील वर्षी याच काळात आयफोनची निर्यात 6.27 अब्ज डॉलरवर गेली होती.  


आयफोनला असणारी मागणी लक्षात घेता उत्पादनात मोठी वाढ 


आयफोनला असणारी मागणी लक्षात घेता उत्पादनात मोठी वाढ झालीय. त्यामुळं निर्यातीत देखील वाढ होत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयफोनच्या निर्मितीत 100 टक्यांची वाढ झालीय. आयफोनच्या जागतिक पुरवठा साखळीत भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. दरम्यान, अमेरिकेच्या बाजारात भारतीय बनावटीच्या आयफोनची मागणी सतत वाढत आहे. दरम्यान, या स्थतिमुळं भारत सध्या चीनला टक्कर देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, देशातील आयफोनचं उत्पादन दिवसेंदिवसं वाढत आहे. येणाऱ्या काळात आणखी उत्पदनात वाढ होणार आहे. त्यामुळं Apple कंपनी भारतात पाच लाख नोकरीच्या संधी उपलब्ध करणार आहे. त्यामुळं देशातील युवकांसाठी दिलासा मिळणार आहे. यामुळं भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. भारतात अॅपल कपंनी विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं विविध धोरणे सध्या कंपनी आखत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


बंपर धमाका! iPhone वर 50 हजार रुपयांची सवलत, आज ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी