मुंबई : देशातील एक कोटी रुपयांहून अधिक टर्नओव्हर असलेल्या उद्योगपती आणि व्यापाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ज्या व्यापाऱ्यांनी अद्याप त्यांचा ऑडिट रिपोर्ट भरला नाही त्यांना आता मुदतवाढ देण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे.आयकर विभागाच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. या निर्णयाचा फायदा केवळ ऑडिट रिपोर्ट भरणाऱ्यांसाठी होणार आहे.


एक कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हर असणाऱ्या उद्योगपती, व्यापारी यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या व्यापाऱ्यांचा ऑडिट रिपोर्ट त्यांच्या सीएकडून भरला जातो. 


देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आणि ऑडिट रिपोर्ट भरण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता 2020-2021 या वर्षासाठीचा ऑडिट रिपोर्ट भरण्याची मुदत वाढवण्यात आली असून ती 15 मार्च करण्यात आली आहे असं आयकर विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. 


 






आयकर विभागाचा दिलासा 
आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करू शकतात. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळणार आहे. 


नियमांनुसार, डिजिटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यावर त्याचा आधार ओटीपी, नेटबँकिंग, डिमॅट खात्याद्वारे पाठवण्यात आलेला कोड व्हेरिफाय करावा लागतो. हे ई-व्हेरिफिकेशन आयकर दाखल केल्यानंतर 120 दिवसांमध्ये करावे लागते. त्याशिवाय करदाते बंगळुरूमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) कार्यालयात आयटीआर कार्यालयात एक प्रत पाठवून व्हेरिफिकेशन करता येऊ शकते. ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही. तो पर्यंत आयकर विवरण दाखल केले नाही, असे म्हटले जाते. 


संबंधित बातम्या :