Income Tax Return : आर्थिक वर्ष 2020-21 आणि मूल्यांकन वर्ष 2021-22 चे इन्कम टॅक्स रिटर्न अद्याप भरले नसेल, तर तुमच्याकडे फक्त पाच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्च 2022 पूर्वी तुमची आयकर रिटर्न फाइल पूर्ण करून इन्कम टॅक्स रिटर्न लगेच भरा. कर सल्लागारांच्या मते, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. 31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरता येणार नाही. इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास पुढील वर्षी अधिक टीडीएस भरावा लागेल.  


आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. आयकर रिटर्न भरण्याची ही शेवटची तारीख होती. तुम्ही अद्याप आर्थिक वर्ष 2020-21 आणि मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही 31 डिसेंबर 2021 पर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरले नसेल तर तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत आयकर रिटर्न भरू शकता. परंतु,  यासाठी तुम्हाला थोड्या प्रमाणात दंड भरावा लागेल.  


किती दंड भरावा लागणार?
आयकर रिटर्न भरण्याच्या अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 नंतर तुम्ही मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी रिटर्न भरल्यास पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. पाच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर एक हजार रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही 31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरले तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. 31 मार्च 2022 पर्यंत आयकर रिटर्न न भरल्यास आयकर विभाग तुम्ही जमा न केलेल्या कराच्या 50 टक्के इतका दंड देखील आकारू शकतो.  


मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची पहिली शेवटची तारीख 31 जुलै 2021 होती. नंतर ती 20 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर 31 डिसेंबर 2021 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती. आता मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी आता तुम्हीला थोडा दंड भरावा लागेल.


महत्वाच्या बातम्या


ABP Ideas of India: भारत 2030 पूर्वी 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो, नीती आयोगच्या उपाध्यक्षांनी वर्तवली शक्यता


Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती