Income Tax Return Tips:  आयकर परतावा (Income Tax Return) भरण्यास सुरुवात झाली आहे. आयकर विभागाकडून याची सुरुवात झाली आहे. तुम्हीदेखील आयकर परतावा दाखल करणार असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. जेणेकरून काही चुकांमुळे तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळणार नाही. 


ITR भरणे सोपे झाले


प्राप्तिकर विभाग प्रत्येक करदात्याला AIS आणि TIS नावाची दोन कागदपत्रे उपलब्ध करून देतो. ही दोन्ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आयटीआर फायलींगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि करदात्यांना सेल्फ-फाइलिंग करणे सोपे करण्यासाठी विभागाने या दोन्ही गोष्टी सुरू केल्या आहेत. या दोन्ही कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही तुमचे आयकर रिटर्न सहज भरू शकता आणि यासाठी तुम्हाला सीएची गरज भासणार नाही.


AIS आणि TIS म्हणजे काय



सर्वप्रथम, AIS आणि TIS म्हणजे काय ते जाणून घ्या... AIS म्हणजेच Annual Information Statement आणि Taxpayer Information Summary म्हणजेच करदात्याच्या माहितीचा सारांश. AIS आणि TIS करदात्यांनी मिळवलेल्या सर्व उत्पन्नाचा तपशील ठेवतात. तुम्ही बचत खाते (बचत खात्यावरील व्याज उत्पन्न) किंवा आवर्ती आणि मुदत ठेव उत्पन्नातून व्याजाच्या स्वरूपात कमावले आहे, सिक्युरिटीज व्यवहारांसह लाभांश रक्कम (डिव्हिडंडमधून उत्पन्न) किंवा म्युच्युअल फंड प्राप्त केली आहे, हे सर्व तपशील या कागदपत्रांमध्ये आहेत.


AIS आणि TIS मधील सर्व माहिती


सोप्या शब्दात, करदात्यांना AIS मध्ये करपात्र रकमेची एकरकमी माहिती मिळते. AIS मध्ये, तुम्हाला पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणार्‍या प्रत्येक उत्पन्नाचा तपशील मिळतो, जो आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्दिष्ट केला आहे. म्हणजे करपात्र श्रेणीत येणाऱ्या प्रत्येक उत्पन्नाची माहिती त्यात उपलब्ध असेल. ज्यामध्ये TIS हा मुळात AIS चा सारांश आहे.


>> AIS/TIS डाउनलोड कसे करायचे?


- आयकर फाइलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) लॉगिन करा. 
- पॅन नंबर, पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
- वरील मेनूमधील सर्व्हिस टॅबवर जा.
- ड्रॉपडाउनमध्ये'Annual Information Statement (AIS)'  निवडा.
- तुम्ही Proceed वर क्लिक करताच एक वेगळी विंडो उघडेल.
- नवीन विंडोमध्ये AIS पर्याय निवडा.
- आता तुम्हाला AIS आणि TIS दोन्ही डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
- तुम्ही AIS आणि TIS PDF किंवा JSON फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता.