Income Tax Refund News : ​टॅक्स रिफंडसाठी (Tax Refund) वेळेवर आयटीआर (ITR) फाइल करणं आवश्यक असते. आयकर विभागाच्या वेबसाइट www.incometax.gov.in वरुन तुम्ही तुमच्या घरच्या घरी आरामात आयटीआर ऑनलाइन दाखल करु शकता. दरम्यान, आयटीआर दाखल केल्यानंतर नोकरदार लोक परताव्याची वाट पाहत असतात. आयटीआर फाईल केल्यानंतर कमीत कमी एका महिन्यात करदात्यांना परतावा जारी केला जातो. तर, काही प्रकरणांमध्ये ई-मेल कळवलेल्या ​पेक्षा कमी आयकर परता​वा दिला जातो. ​तुम्हालापण दावा केल्यापेक्षा कमी आयकर परतावा मिळाला असेल तर  नेमकं काय करावं? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


आयटीआरवर प्रक्रिया केल्यानंतर चार ते पाच आठवड्यांच्या आत टॅक्स परतावा मिळतो


दरम्यान, आयकर विभागाकडून एकदा आयटीआरवर प्रक्रिया केल्यानंतर चार ते पाच आठवड्यांच्या आत टॅक्स परतावा जारी केला जातो. करदात्यांना कळवण्यासाठी की फाइल करण्यात आलेल्या आयटीआरवर प्रक्रिया सुरु झाली आहे. कलम 143 (1) अंतर्गत सूचना जारी केली जाते. तुमच्या ई-मेलवर पाठवली जाते. तुम्ही ई-फायलिंग पोर्टल डॅशबोर्डवर देखील आयटीआरची स्थिती तपासू शकता. आयकर कायद्याच्या कलम 143 (1) अंतर्गत करदात्यांना सूचना पाठवली जाते. त्यात कर दायित्वाचे कॅल्क्युलेशन आणि तुम्हाला देय असलेल्या कर परताव्याची माहिती दिली जाते. आयकर विभागाची वेबसाइट तुमच्या रिफंडची स्थिती तपासण्यासाठी एक साधन प्रदान करते. तुमचा पॅन आणि मूल्यांकन वर्ष तपशील प्रविष्ट करुन तुम्ही प्रगती अहवालाचा मागोवा घेऊ शकता. 


परताव्यावर कसा घ्याल आक्षेप? 


तुम्हाला कर विभागाकडून देय कर परताव्याच्या रकमेबद्दल माहिती देणारी कलम 143 (1) अंतर्गत सूचना मिळाली असेल, तर कर विभागाने विचारात घेतलेली गणना काळजीपूर्वक पाहा. आयकर विभागाचे गणित चुकले आहे आणि तुम्हाला जास्त टॅक्स रिफंड मिळायला हवा तर तुम्ही कलम 154 अंतर्गत Rectification (सुधारणा) करण्याची विनंती करु शकता. 143 (1)  नुसार जारी केलेल्या सूचना किंवा CPC द्वारे पास केलेल्या 154 च्या आदेशानुसार रेकॉर्डमधून स्पष्टपणे कोणतीही चूक आढळल्यास आयकर ई-फायलिंग पोर्टलवर रेक्टिफिकेशनची विनंती केली जाऊ शकते. तसेच CPC द्वारे तुमच्या आयकर रिटर्नच्या प्रक्रियेतील त्रुटींसंदर्भात तुम्ही दुरुस्त करण्याची विनंती करु शकता. रेकॉर्डमध्ये स्पष्ट असलेल्या चुका सुधारण्यासाठी विचारात घेतल्या जातात. यामध्ये 143 (1) अंतर्गत सूचना दिल्या गेल्या आहेत. त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून चार वर्षांच्या समाप्तीनंतर तुम्हाला सुधारणा विनंती दाखल करण्याची परवानगी नाही. 


तीन प्रकारे अर्ज करु शकता


आयकर रिटर्नवर पुन्हा प्रक्रिया करणे
टॅक्स क्रेडिट जुळत नसल्यास सुधारणेसाठी
परतावा डेटा सुधारणा 


कलम  143 (1) अंतर्गत सूचना तुम्हाला देय असलेला एकूण कर परतावा अशा कर परताव्यावर व्याजासह दर्शवते. पण आयटीआर आणि विभागाच्या रेकॉर्डमध्ये तुम्ही नमूद केलेल्या माहितीमध्ये काही जुळत नसल्यास तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.


कलम  143 (1) (अ) अंतर्गत कधी कोणत्या कारणासाठी नोटीस मिळू शकते? 


परताव्यात गणितीय चूक असल्याच नोटीस मिळते.
उत्पन्नाच्या परताव्यात सादर केलेल्या माहितीवर आधारित चुकीचा दावा असल्यास
तोटा उत्पन्नाच्या विरुद्ध सेट ऑफसाठी दावा केला गेला आहे आणि देय तारखेच्या पुढे परतावा दाखल केला जाईल.
प्रकरण कर लेखापरीक्षणात (ऑडिट) समाविष्ट असेल आणि लेखापरीक्षकाने काही वस्तूंची परवानगी नाकारली किंवा काही उत्पन्नाची करपात्रता दर्शवली असेल आणि फाइल करताना त्याचा विचार केला जात नसेल तर नोटीस मिळते.