Income Tax Filing:  तुम्ही जर Income Tax return भरत असाल तर तुमच्यासाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे. आयकर विवरण पत्र भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. सध्या दररोज चार लाखांहून अधिकजण आयकर विवरण पत्र दाखल करत आहेत. आतापर्यंत तीन कोटीहून अधिकजणांनी आयकर विवरण पत्र भरले आहे. तुम्हीदेखील स्वत: आयकर विवरण पत्र  (ITR) भरू शकता. त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया जाणून घ्या.  


जाणून घ्या सोपी पद्धत: 


>  आयकर ई-पोर्टलला भेट द्या


> होमपेजवर  ‘login here’पर्यायावर क्लिक करा.


> तुमचा PAN Card क्रमांक  ‘enter your user ID’ या पर्यायामध्ये नमूद करा आणि continue वर क्लिक करा 


>  ‘secure access message’ वर continue करा 


> आता तुम्हाला सहा अंकी वन-टाइम पासवर्ड (OTP) हा एसएमएस किंवा व्हॉइस कॉलद्वारे प्राप्त करायचा आहे, याची निवड करा


>पर्याय निवडल्यानंतर Enter पर्यायावर क्लिक करा


> आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी व्यक्ती त्यांचा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा नेट बँकिंग देखील वापरू शकतात.


> आधार पर्याय वापरताना,  आधार क्रमांक तसेच प्राप्त झालेला ओटीपी नमूद करावा लागेल. 


> नेट बँकिंगद्वारे युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करावा लागेल. 


> लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या आयटी रिटर्नवर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचा वापर करा.



काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने ट्वीट करून नागरिकांना आयकर विवरण पत्र भरण्याची सूचना केली. आयकर विवरण दाखल करण्यासाठी शेवटच्या तारखेची प्रतिक्षा न करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: