Serum Institute Executive Director Death : सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. डॉक्टर जाधव हे 72 वर्षांचे होते. सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरील कोव्हिशील्ड वॅक्सीन तयार करण्यात डॉक्टर जाधव यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. डॉक्टर जाधव यांच्या जाण्यानं भारतीय वैद्यकिय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


डॉ. सुरेश जाधव यांनी कोरोना लसीच्या संशोधनात मोलाचं योगदान दिलं. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशील्ड तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यांनी भारतातील लस संशोधनात योगदान दिलं. तसेच जागतिकस्तरावर कामातून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे त्यांना भारतीय लस संशोधनातील भिष्माचार्य म्हटलं जातं. त्यांच्या नावावर जगभरातील अनेक पेटंट आहेत. डॉ. जाधव यांच्या जाण्यामुळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. 


संग्रहित : लस संशोधनातील 'भीष्माचार्य' डॉ. सुरेश जाधव यांच्यासोबतचा 'माझा कट्टा'



डॉ. सुरेश जाधव यांची कारकीर्द 



  • डॉ. सुरेश जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये 'पीएच. डी.' घेऊन 1970 पासून पन्नास वर्षांची अखंड सेवा दिली. 

  • त्यांचा कार्यकाल मार्च 2022 पर्यंत असला तरी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. 

  • सुरुवातीला नागपूर विद्यापीठ आणि 'एसएनडीटी' विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम केलं

  • हापकिनमध्ये संशोधक म्हणून त्यांनी लस उत्पादनासंबंधी काम चालू केलं

  • सन 1979 पासून सीरम इन्स्टिट्यूट येथे रुजू झाले 


माझा कट्ट्यावर बोलताना काय म्हणाले होते डॉ. सुरेश जाधव : 


Majha Katta : शाळकरी मुलांना लस कधी? Mask कधीपर्यंत वापरावा लागेल?, डॉ. सुरेश जाधवांकडून ऐका उत्तरं