Hurun Youngest Billionaires: Hurun India Rich List 2024 मध्ये 300 हून अधिक भारतीय अब्जाधीशांचा (Billionaires) समावेश करण्यात आला आहे. तर यामध्ये fintech फर्म Razorpay चे संस्थापक हर्षिल माथुर (Harshil Mathur) आणि शशांक कुमार (Shashank Kumar) यांचा देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हर्षिल माथूर आणि शशांक कुमार हे मित्र आहेत. या दोघांनी एकत्र येत व्यवसाय सुरु केला. आज त्यांचा जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत समावेश झाला आहे.
वय 33 वर्षे, संपत्ती 8000 कोटींहून अधिक
Razorpay चे 33 वर्षीय सह-संस्थापक हर्षिल माथूर आणि शशांक कुमार यांचा समावेश हुरुन रिच लिस्ट 2024 मध्ये सर्वात तरुण भारतीय अब्जाधीशांच्या यादीत करण्यात आला आहे. IIT रुरकीच्या माजी विद्यार्थ्यांची आज अंदाजे निव्वळ संपत्ती 1.03 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 8700 कोटी रुपये आहे. आयआयटीमध्ये शिकत असताना हर्षिल आणि शशांक यांची भेट झाली. याकाळातच त्यांची घट्ट मैत्री झाली. त्यांचे Razorpay स्टार्टअप पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करते. Razorpay व्यापाऱ्यांना पेमेंट प्राप्त करण्यासाठी एक सोपा पर्याय प्रदान करतो. म्हणजेच हे ग्राहक आणि व्यापारी यांच्यातील पेमेंटचे साधन आहे. परंतु यामध्ये फक्त व्यापारी पेमेंट घेऊ शकतो, तर केवळ ग्राहक पेमेंट करु शकतो
हर्षिल आणि शशांकची यशोगाथा एका दशकापूर्वी सुरू झाली. जेव्हा भारतातील ऑनलाइन पेमेंट क्षेत्राची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. Razorpay हे फिनटेक स्टार्टअप आहे. जे विशेषतः स्टार्टअपसाठी तयार केले गेले आहे. या दोघांनी 2014 मध्ये एकत्र येत व्यवसाय सुरू केला. हर्षिल आणि शशांक आयआयटीमध्ये शिकत असताना क्राउडसोर्सिंग प्लॅटफॉर्म तयार करत होते. जेव्हा त्यांना कल्पना आली की स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना ऑनलाइन पेमेंट करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. ज्याचे निराकरण करण्यासाठी त्यांना एक विशेष प्लॅटफॉर्म विकसित करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी Razorpay सुरू केले.
कसा केला व्यवसाय सुरु?
भारतात ऑनलाइन पेमेंट चांगले होत नसल्याचे पाहून, मी माझा मित्र शशांक कुमार यांच्यासोबत Razorpay सुरू करण्याचा विचार केल्याची माहिती हर्षिल माथूर यांनी दिली. काहीतरी नवीन केले आणि Razorpay वर काम करायला सुरुवात केली. मी Razorpay चा CEO आणि सह-संस्थापक आहे, तर शशांक कंपनीचा सह-संस्थापक आणि MD आहे. मी शशांकला IIT रुरकीमध्ये शिकत असताना भेटलो आणि तिथूनच आमची मैत्री सुरू झाली. आम्ही कोडींगच्या आमच्या सामायिक आवडीने प्रेरित झालेल्या अनेक प्रकल्पांवर एकत्र काम केले. आमच्या कॉलेजच्या दिवसांत आम्ही लिहिलेले बरेचसे कोड आजही Razorpay च्या ऑपरेशन्सचा कणा असल्याचे हर्षिल माथूर म्हणाले.
Razorpay काम कसे करते?
पैशांचे व्यवहार सुलभ करणारे हे व्यासपीठ आहे. Razorpay ने कंपन्या आणि व्यापाऱ्यांसाठी एक साधा पेमेंट गेटवे लॉन्च केला आहे. याद्वारे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि डिजिटल वॉलेटद्वारे ऑनलाइन पेमेंट करता येते. Razorpay व्यवहार शुल्काद्वारे पैसे कमावते. प्लॅटफॉर्म प्रत्येक व्यवहारासाठी फक्त 2 ते 3 टक्के शुल्क आकारतो. विशेष गोष्ट अशी आहे की RazorPay भारतातील अनेक प्रमुख वॉलेटला देखील सपोर्ट करते. ज्यात JioMoney, Mobikwik, Airtel Money, Freecharge, OlaMoney आणि PayZapp यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या: