मुंबई: एकीकडे भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रांगेत जाऊन बसत असताना या देशातील अतिश्रीमंत अशा अब्जावधींच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. गेल्या पाच वर्षांत हजारो कोटींची संपत्ती असलेल्या श्रीमंतांच्या संख्येत 75 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या भारतात अशा अब्जाधीशांची संख्या 1300 अधिक झाली आहे.  हुरून इंडियाच्या (Hurun India Rich List) एका अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. 


हजारो कोटी संपत्तीधारकांच्या यादीत वाढ


हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, सध्या भारतात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या 1,319 झाली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, श्रीमंत लोकांच्या या क्लबमध्ये 278 नवीन लोक सामील झाले आहेत. भारतात 1000 कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या लोकांची संख्या 1300 च्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या पाच वर्षांत भारतात अशा लोकांची संख्या 75 टक्क्यांनी वाढली आहे.


भारतीय उद्योजक आत्मविश्वासी


भारताची अर्थव्यवस्था जगभरात घोडदौड करत असताना उद्योग क्षेत्र सकारात्मक असल्याचं सध्याचं चित्र आहे. हुरुन ग्लोबलचे अध्यक्ष रुपर्ट हूगवर्फ म्हणतात की, जगातील इतर देशांतील उद्योगपतींपेक्षा भारतीय व्यावसायिक अधिक आत्मविश्वासाने भरलेले आहेत. नवीन वर्ष हे त्यांना आणखी चांगले जाणार आहे असे त्यांना वाटते. जगाच्या इतर भागात असे नाही. चिनी व्यावसायिाकांसाठी यंदाचं वर्ष वाईट जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युरोपातही आशावाद दिसत नाही.


भारत आणि चीनमधील श्रीमंतांमधील फरक


भारत आणि चीनमधील श्रीमंतांची तुलना करताना, हूगवर्फ यांनी नमूद केले की दोन्ही देशांच्या श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांमध्ये फरक आहे. भारताच्या बाबतीत कुटुंबावर आधारित रचना आहे, ज्यांचे व्यवसाय साम्राज्य पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत. चीनमध्ये बहु-पिढीच्या बिझनेस हाऊसची कमतरता आहे. तथापि, हुगवर्फ हे भारताची कुटुंब-आधारित रचना दुधारी तलवार मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की यातून परंपरा समृद्ध होत असली तरी नवनिर्मितीवर त्याचा परिणाम होतो.


या दोन क्षेत्रांतून श्रीमंत लोक निर्माण होतील


आगामी वर्षांच्या संदर्भात हुगवर्फ म्हणतात की सर्वात श्रीमंत लोक दोन क्षेत्रांतून उदयास येणार आहेत. पहिला सेक्टर AI आणि दुसरा सेक्टर म्हणजे इलेक्ट्रिक वाहने. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांना एआयचा फायदा झाला आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे मूल्यांकन सातशे ते आठशे अब्ज डॉलर्सनी वाढले आहे. 


ही बातमी वाचा: