नवी दिल्ली: कोरोना काळात जगभरासह भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना भारतीय अब्जाधीशांच्या संख्येत मात्र वाढ झालेली दिसते. हुरुन ग्लोबल रिच नुसार कोरोना काळात भारतात तब्बल 40 उद्योगपतींची अब्जाधीश क्लबमध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे भारतात सध्या कोरोना अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली असून ती संख्या आता 177 झाली आहे.


जवळपास 83 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेले रिलायन्सचे मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या वेळी जागतीक श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी हे आता आठव्या स्थानी पोहचले आहेत. कोरोना काळात त्यांच्या संपत्तीत 24 टक्क्यांची वाढ झाली आहे.


हुरुन इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनास रहमान जुनैदा यांच्या मते अमेरिका आणि चीनमध्ये संपत्तीची निर्मीती ही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे तर भारतात यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. भारतात पारंपरिक किंवा सायकलिक बिझनेसच्या माध्यमातून संपत्तीची निर्मीती होताना दिसत आहे. हुरुन इंडियांच्या मते, भारतात ज्यावेळी भारतात तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्ण क्षमतेने संपत्तीची निर्मिती होईल त्यावेळी भारत अब्जाधीशांच्या संख्येत अमेरिकेलाही मागे टाकेल.


Mukesh Ambani: रिलायन्सचे मुकेश अंबानी आता थेट इलॉन मस्कशी भिडणार...ऊर्जा क्षेत्रात भक्कम गुंतवणूक


कोरोनाच्या काळात उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली असून त्यांची संपत्ती आता 32 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. याचबरोबत गौतम अदानी हे आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 48 व्या स्थावावरुन 20 व्या स्थानावर पोहचले आहेत. ते आता भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. त्यांचे बंधू विनोद अदानी यांची संपत्ती कोरोना काळात 128 पटींनी वाढली असून ती 9.8 अब्ज डॉलरवर पोहचली आहे.


पंतजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण यांची संपत्तीत 32 टक्कांनी घट झाली असून ती 3.6 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. महिंद्रा ग्रुपच्या संपत्तीतही 100 टक्क्यांची वाढ झाली असून ती 2.4 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. महिला अब्जाधीशांचा विचार करता किरन मुजूमदार शॉ यांच्या संपत्तीत 41 टक्क्यांची वाढ झाली असून ती 4.8 अब्ज झाली आहे.


Bloomberg Billionaire Index: इलॉन मस्क यांना मागे टाकत जेफ बेझोस पून्हा सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी टॉप टेनमधून बाहेर