HUL product price hike : गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढताना दिसत आहेत. नुकतेच पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. त्या पाठोपाठ आता गॅस सिलेंडर, साबण, सर्फ एक्सल यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने (HUL) वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर साबण आणि सर्फच्या किंमती वाढविल्या आहेत. FMCG कंपनीने किंमती 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. व्हील, रिन, लाईफबॉयसह अनेक साबणांच्या किमतीतही वाढ झाली आहे.
कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ :
कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मागच्या वर्षीसुद्धा साबण आणि सर्फच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढला होता.
Dove आणि Pears च्या 125 ग्रॅम प्रति युनिटच्या पॅकच्या किंमतीत 10-12 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, लाइफबॉय साबणाच्या 4 बंडल असलेल्या पॅकची किंमत 124-136 रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 500 ग्रॅम आणि 1 किलो wheel डिटर्जंटच्या पॅकची किंमत 32 रुपयांवरून 33 रुपये आणि 63 रुपयांवरून 65 रुपये करण्यात आली आहे. कंपनीने विम लिक्विडच्या (Vim Liquid) 500 मिली पाऊचची किंमत 99 रुपयांवरून 104 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने कंपनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरने 2022 मध्ये कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याचे कारण देत अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवल्या होत्या.
कोणकोणत्या वस्तू महागल्या ?
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट बिघडणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार, भाज्या, धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता गॅस आणि इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. लिंबाच्या दरानेही शंभरी पार केली आहे.
महत्वाच्या बातम्या :