Silver New High Rate On MCX : चांदीची (Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी चांदीची खरेदी करणाऱ्यांना निराश करणारी आहे. सध्या चांदीच्या दरात (Silver Rate) मोठी वाढ होताना दिसत आहे. चांदीचा दर हा 95000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर चांदीच्या दरानं हा विक्रम केला आहे.


चांदी लवकरच ओलांडणार 95000 रुपयांचा टप्पा


मिळालेल्या माहितीनुसार, चांदी लवकरच 95000 रुपयांचा टप्पा ओलांडून 1 लाख रुपयांचा टप्पा गाठणार आहे. दिवसेंदिवस चांदीच्या दरातील वाढ होण्याचा कल कायम आहे. चमकदार धातूच्या किमती सतत नवीन उंची गाठत आहेत. आजच्या व्यवहारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात वाढ दिसून आली. ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सततच्या वाढीच्या आधारे एमसीएक्सवर चांदीचा दर हा 1 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या महिन्यातच ही पातळी गाठली जाऊ शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.


एमसीएक्सवर चांदीच्या दरानं गाठला 94868 रुपयांचा टप्पा 


एमसीएक्सवर चांदीच्या दरानं 94868 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे, लवकरच चांदी 1 लाख रुपयांचा टप्पा गाठणार आहे. चांदीचा दर प्रथमच 95,000 रुपयांच्या जवळ आला आहे. आजच्या व्यवहारात 94511 रुपये प्रतिकिलोचा नीचांक दिसून आला, तर कालच्या व्यवहारात चांदीचा भाव 94725 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. 


आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात घसरण 


एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात घसरण सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, चांदीच्या वाढत्या दरामुळं चांदीची खरेदी करावी की नको? असा प्रश्न ग्राहकांसमोर येत आहे. दरम्यान, 20 मे 2024 रोजी, मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामुळे कमोडिटी मार्केट बंद असले तरी, स्पॉट मार्केटमध्ये चांदीचे भाव गगनाला भिडले होते. या दिवशी देशातील अनेक शहरांमध्ये चांदीचा भाव किलोमागे एक लाख रुपयांच्या वर गेला होता. 


गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच सोने चांदीच्या दरात वाढ होत असल्यानं नागरिक सोन्या चांदीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक ग्राहक सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे म्हणून यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडत आहेत. अशा लोकांना सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा होत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे? जाणून घ्या नेमका दर काय?