आयटीआर भरताना 'या' साध्या-साध्या चुका पडू शकतात महागात; होऊ शकते मोठी अडचण!
Income Tax Return: वित्त वर्ष 2023-24 आणि असेसमेंट वर्ष 2024-25 वर्षासाठी कोताही दंड न भरता 31 जुलैपर्यंत आयटीआर भरता येईल. 31 जुलैपर्यंत आयटीआर भरल्यास 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही 31जुलैपर्यंत आयटीआर भरत असाल तर खालील चुका करू नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल करता न आल्यास तुम्हाला नंतर 1000 ते 3000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच
आयटीआर भरताना खासगी माहिती अपडेट करताना पॅन नंबर, बँक डिटेल्स योग्य पद्धतीने न भरल्यास तुम्हाला रिफंड होण्यास उशीर होऊ शकतो.
वेगवेगळ्या करदात्यांसाठी वेगवेगळा आयटीआर फॉर्म असतो. तुम्ही चुकीचा आयटीआर फॉर्म भरल्यास तुम्हाला आयटीआर फिलिंगची प्रक्रिया पुन्हा एकदा करायला लागू शकते. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आयटीआर-1 हा पगारदार लोकांसाठी असतो तर आयटीआर 4 हा फॉर्म प्रोपेशनल्स आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी असतो.
आयटीआर फॉर्म भरताना तुमच्या उत्पन्नाचे सेव्हिंग खात्यातून मिळणारे व्याज, एफडी, घरभाडे आदी छोटे-छोटे सोअर्सही द्यायला विसरू नका. ही माहिती न दिल्यास त्याचा फटका तुम्हालाच बसू शकतो.
फॉर्म 26AS कडे दुर्लक्ष करू नका. या फॉर्मच्या मदतीने तुम्हाला टीडीएसची मोजणी करणे सोपे होईल.
आयटीआरला व्हेरिफाय न करणे ही चूक अनेकजण करतात. ई-व्हेरिफिकेशनशिवाय आयटीआर फिलिंगची प्रक्रिया पूर्ण होतच नाही.