मुंबई : ईपीएफओ (EPFO) खातेधारकांनी सलग 10 वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी पीएफ जमा केल्यास ते EPS योजेअंतर्गत पेन्शनसाठी पात्र असतात. नियमानुसार हे पेन्शन खातेधारकाला निवृत्त झाल्यावर मिळते. मात्र हेच पेन्शन 58 वर्षांआधी हवे असेल तर मिळू शकते का? त्यासाठी Early Pension करता येते का? असे विचारले जाते. याच पार्श्वभूमीवर अर्ली पेन्शन मिळवण्यासाठी काय करायला हवे? हे जाणून घेऊ या..


Early Pension साठी कधी अर्ज करता येतो? 


तुम्ही ईपीएफओ पेन्शनसाठी पात्र असाल आणि तुमचे वय 50 ते 58 वर्षे यामध्ये आहे तर तुम्हाला Early Pension साठी अर्ज करता येतो. 50 वर्षांपेक्षा कमी वय असणारी व्यक्ती कालावधीच्या अगोदर पेन्शनसाठी अर्ज करू शकत नाही.  Early Pension हवे असेल तर तुम्हाला Composite Claim Form भरावा लागतो. यामध्ये अर्ली पेन्शनसाठी तुम्हाला 10D हा ऑप्शन निवडावा लागेल. 


किती पेन्शन मिळणार?


58 वर्षांच्या जेवढं अगोदर तुम्ही पेन्शनसाठी अर्ज कराल, तेवढेच कमी पेन्शन तुम्हाला मिळेल. नियमानुसार प्रत्येक वर्षासाठी चार टक्के याप्रमाणे तुम्हाला कमी पेन्शन दिले जाते. उदाहरणासह समजून सांगायचं झाल्यास समजा एखादा ईपीएफओ सदस्य वयाच्या 56 व्या वर्षी अर्ली पेन्शनसाठी अर्ज कर असेल तर त्याला त्याल मूळ पेन्शन रकमेपैकी 92 टक्केच रक्कम मिळेल. 58 वर्षे होण्याच्या दोन वर्षांअगोदर तुम्ही अर्ली पेन्शनसाठी अर्ज केल्यास एकूण मिळणाऱ्या पेन्शनपैकी 8 टक्के रक्कम कमी दिली जाईल. 


दहापेक्षा कमी वर्षाचे पीएफ योगदान असेल तर काय होईल? 


ईपीएफओमध्ये तुमचे योगदान हे दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पेन्शन मिळत नाही. अशा स्थितीत तुमच्याकडे एकूण दोन पर्याय असतो. तुम्हाला यापुढे नोकरी करायची नसेल तर तुम्ही तुमची पीएफची रक्कम तसेच पेन्शनची रक्कम काढून घेऊ शखता. तसेच भविष्यात तुमचा नोकरी करण्याचा विचार असेल तर तुम्ही पेन्शन स्कीम सर्टिफिकेट घेऊ शकता. भविष्यात तुम्ही जेव्हा पुन्हा एकदा नोकरी कराल तेव्हा याच प्रमाणपत्राच्या मदतीने तुम्ही तुमचे नवे पेन्शन अकाऊंट जुन्या पेन्शन अकाऊंटशी जोडू शकता. त्यानंतर तुम्ही 10 वर्षे नोकरी करून ईपीएफओच्या नियमानुसा पेन्शनसाठी पात्र ठरू शकता. 


हेही वाचा :


पैसे कमवण्याची संधी चुकवू नका, नव्या आठवड्यात दोन नवे आयपीओ येणार!


एका वर्षांत मिळाले 420 टक्के रिटर्न्स, 'या' कंपनीचे शेअर्स तुम्हालाही करू शकतात मालामाल!


नावाला पेनी स्टॉक, पण ठरतोय शेअर बाजारातील किंग, 'या' कंपनीच्या शेअरने दिले 3400 टक्के रिटर्न्स!