Shani Dev : ज्या प्रमाणे पौर्णिमा  काही दिवसांतच ज्येष्ठ अमावस्येला सुरुवात होणार आहे. शनीला (Shani Dev) प्रसन्न करण्यासाठी ज्येष्ठ अमावस्या शुभ मानली जाते. शनीला (Lord Shani) न्यायदेवता म्हटलं जातं. शनीची वक्र दृष्टी जितकी धोकादायक असते तितकाच व्यक्तीला साडेसाती आणि ढैय्या यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.


सध्या तीन राशींवर साडेसातीचा प्रभाव आहे. तर, दोन राशींवर ढैय्या सुरु आहे. यासाठीच येणाऱ्या ज्येष्ठ अमावस्येला शनी जयंतीच्या दिवशी या पाच राशीच्या लोकांनी शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात.  


यंदा शनी जयंती 6 जून रोजी साजरी होणार असून, ज्येष्ठ अमावस्याही याच दिवशी आहे. शनी जयंतीचा दिवस शनीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. सध्या अशा 5 राशी आहेत ज्यावर शनीची वाईट नजर आहे. या राशीच्या लोकांचा सध्या वाईट काळ सुरु आहे. शनी जयंतीच्या निमित्ताने या पाच राशींसाठी उपाय या ठिकाणी सांगण्यात आले आहेत. 


शनीची 'या' राशींवर वाईट नजर 


ज्या राशींवर शनीची वाईट नजर असते त्या राशींसाठी हा काळ फार संघर्षाचा असतो. त्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसतीचा प्रभाव असतो. कर्क आणि वृषभ राशीवर शनीच्या धैय्याचा प्रभाव आहे.


साडेसाती आणि ढैय्या टाळण्यासाठी 'हे' उपाय करा 



  • शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. यामुळे पितरही प्रसन्न होतात आणि शनीच्या वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.

  • शनी जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची पूजा करा. बजरंगबलीची पूजा केल्यानंतर सुंदरकांडचं पठण करा. यामुळे शनीची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव कमी होतो.

  • शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनीला मोहरीच्या तेलाने स्नान करावे. तसेच काळ्या तिळाचा दिवा लावावा. शनीच्या वाईट प्रभावापासून तुम्हाला आराम मिळेल.


कधी आहे ज्येष्ठ अमावस्या? 


ज्येष्ठ अमावस्या 5 जून रोजी संध्याकाळी 6.43 वाजता सुरू होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी 6 जून रोजी संध्याकाळी 07:12 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, अमावस्या तिथी 6 जूनलाच मानली जाईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला चुकूनही 'या' चुका करू नका; भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी 'या' मंत्रांचा जप करा