मुंबई : सध्या प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरण्यासाठी लोकांची लगबग चालू आहे. नोकरदार मात्र फॉर्म क्रमांक 16 च्या प्रतिक्षेत आहेत. या फॉर्मवर एखाद्या नोकरदाराला किती पगार मिळतो तसेच त्याचा किती कर कापला जातोय, याची सर्व माहिती असते. याच माहितीच्या आधारे नंतर नोकरदार आयटीआर फॉर्म भरत असतो. आयटीआर भरण्यासाठी  16A आणि 27D फॉर्मदेखील महत्त्वाचे आहेत. याच पार्श्वभूमीवर फॉर्म 16 कसा डाऊनलोड करावा, हे जाणून घेऊ या.


कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या शेवटी किंवा 15 जूनच्या अगोदर फॉर्म क्रमांक 16 देतात. मात्र कंपनीने हा फॉर्म देण्याची वाट पाहात बसण्यापेक्षा अन्य एका मार्गानेदखील फॉर्म 16 तसेच 16A आणि 27D हे फॉर्मदेखील मिळवता येतात.  


फॉर्म 16,16A आणि 27D म्हणजे काय


प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी जी माहिती गरजेची असते, ती सर्व माहिती फॉर्म क्रमा 16 वर असते. आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना हा फॉर्म द्यावा लागतो. याच कारणामुळे कंपन्या मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या मध्यापर्यंत हे फॉर्म क्रमांक 16 जारी करतात. फॉर्म 16 A या फॉर्ममध्ये कापलेला टीडीएस, पॅन, टॅन यांची त्रैमासिक माहिती दिलेली असते. 27D या फॉर्ममध्ये गेल्या तीन महिन्यांतील संपूर्ण तपशील असतो. करदात्याने कर दिलेला आहे की नाही, याची सविस्तर माहिती या फॉर्मवर नमूद असते. आयटीआर भरायचा असेल तर या सर्व कागदपत्रांची गरज असते.  
 
ज्या आर्थिक वर्षाचा कर कापलेला आहे, त्याच्या पुढच्याच वर्षी  15 जूनच्या अगोदर कर्मचाऱ्याला फॉर्म क्रमांक 16 मिळतो. हा फॉर्म TRACES या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतो. मात्र या संकेतस्थळावर संपूर्ण फॉर्म 16 नसतो.  


फॉर्म 16, 16A आणि 27D फॉर्म कसा डाऊनलोड करावा?


1. हे फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला अगोदर www.tdscpc.gov.in/en/home.html या संकेतस्थळावर जावे लागेल. 
2. त्यानंतर 'लॉगिन' करावे. पुढे 'टैक्‍सपेअर' या  सेक्शनमध्ये जावे
3.  तेथे यूजर आयडी, पासवर्ड टाकून लॉगीन करावे 
4. 'टॅक्स क्रेडिट पाहा किंवा व्हेरिफाय करा' या ऑप्शनवर जाऊन क्लीक करा
5. टीडीएस प्रमाणपत्र 16/16 A/27डी या पर्यायावर क्लीक करा
6. त्यानंतर एक नवे पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही ज्याच्यासाठी अर्ज केलेला आहे, तो पर्याय निवडावा
7.'प्रोव्हिजलनल सर्टिफिकेट'च्या ऑप्शनमध्ये जाऊन 16, 16A, 27D तुम्हाला जो फॉर्म डाऊनलोड करायचा आहे, तो करावा. 


हेही वाचा :


बिझनेसमध्येही विराट-अनुष्क सुस्साट! 4 वर्षांपूर्वी गुंतवले अडीच कोटी, आता मिळवणार थेट तिप्पट रिटर्न्स


50-30-20 चा नियम आहे तरी काय? पगार संपणार नाही, सेव्हिंगही होणार भरपूर!