2000 Rupees Notes: 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा उद्याचा ( 7 ऑक्टोबर 2023) शेवटचा दिवस आहे. तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा शिल्लक असतील, तर त्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्याची ही शेवटची संधी आहे. मात्र, उद्यापर्यंत जर या नोटा जमा केल्या नाहीत, तर पुढे काय? याबाबत आज RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत दोन मार्ग सांगितले आहेत.


रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना दास यांनी सांगितले की, आरबीआयकडे अद्याप 2000 रुपयांच्या 12,000 कोटी रुपयांच्या नोटा परत येणं बाकी आहे. म्हणजेच 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी केवळ 87 टक्के नोटा परत आल्या आहेत. 12,000 कोटी रुपयांच्या या नोटा अजूनही शिल्लक आहेत. त्या परत करण्याचा किंवा बदलून देण्याची उद्या शेवटचा दिवस आहे.


7 ऑक्टोबर 2023 नंतर 2000 रुपयांच्या नोटा परत करायच्या असतील तर RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. जर 8 ऑक्टोबर 2023 पासून बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलल्या जाणार नाहीत, तर तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. याबाबत बोलताना शक्तीकांत दास म्हणाले की, देशातील अनेक राज्यांमध्ये आरबीआयची इश्यू ऑफिसेस आहेत जिथे या 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या जाऊ शकतात. 


पहिली पद्धत


ज्या लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी  RBI च्या 19 कार्यालयांना भेट देऊन या 2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात किंवा जमा कराव्यात. या अंतर्गत, एक्सचेंजसाठी 20,000 रुपयांची मर्यादा आहे. म्हणजेच सामान्य लोक किंवा संस्था या 19 आरबीआय जारी कार्यालयांमध्ये एका वेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात. जर तुम्हाला भारतातील बँक खात्यात पैसे जमा करायचे असतील तर यासाठी कोणतीही मर्यादा नाही.


दुसरी पद्धत


2000 रुपयांच्या नोटा भारतीय टपाल किंवा भारतीय टपाल विभागाद्वारे आरबीआय जारी कार्यालयात पाठवल्या जाऊ शकतात. ही रक्कम फक्त भारतातील त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते.


नोटांसोबत वैध ओळखपत्राची माहिती द्यावी


न्यायालये किंवा कायदेशीर एजन्सी, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी, कोणत्याही तपासात गुंतलेली एजन्सी, तपास संस्था किंवा अंमलबजावणीमध्ये गुंतलेली कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे देखील देशात सध्या असलेल्या RBI च्या 19 जारी कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. त्यांच्यासाठी नोटा जमा करण्याची मर्यादा नाही.
आरबीआयच्या नियमांनुसार या 2000 रुपयांच्या नोटांसोबत वैध ओळखपत्राची माहिती द्यावी लागेल. याशिवाय आरबीआयने काही सूचना दिल्या आहेत ज्यानुसार 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतील.


महत्त्वाच्या बातम्या:


Rs. 2000 notes : मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, पण त्यानंतर काय?