Asian Games : भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा सीनियर संघ नेदरलँडविरुद्ध चाचपडत असतानाच तिकडं आशियाई गेम्समध्ये (Asian Games) पाकिस्तानच्या (Pakistan) ज्युनिअर संघाला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अफगाणिस्ताने ( Afghanistan) अक्षरशः लोळवत गेमच्या फायनलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने चार विकेटने पराभव करत अंतिम प्रवेश केला. त्यामुळे अफगाणिस्तानची लढत आता सुवर्णपदकासाठी भारताशी होईल. उद्या ( 7 ऑक्टोबर) रोजी सकाळी साडे अकरा वाजता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील टीम इंडियाविरोधात (India will face Afghanistan in Final of Asian Games) अफगाणिस्तानची लढत होईल. भारताने आज बांगलादेशला सहज धुळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला.
नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने पहिल्यांदा पाकिस्तानला फलंदाजी दिली. मात्र, पाकिस्तानचा डाव अवघ्या 115 धावांमध्ये 18 षटकांमध्ये आटोपला. अफगाणिस्तान गुलबदीन एक विकेट घेतली, तर फरीद अहमदने तीन विकेट घेतल्या. कईस अहमदने दोन विकेट घेतल्या. करीम जनतने एक विकेट, तर झहीर खानने दोन विकेट घेतल्या. अवघ्या 115 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या अफगाणिस्तानची ( Afghanistan) सुरुवात सुद्धा खराब झाली होती. अवघ्या 14.1 षटकांत 6 बाद 84 अशी झाली होती. मात्र, सातव्या विकेटसाठी गुलबदीन नैब शराफुद्दीन अश्रफ यांनी केलेल्या 32 धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानला विजय मिळवता आला.
तत्पूर्वी, आज सकाळी झालेल्या लढतीत ऋतुराज्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा (Bangladesh) 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 96 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने 9.2 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून तिलक वर्माने नाबाद 55 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने नाबाद 40 धावा केल्या. साई किशोरने 3 विकेट्स घेतले. वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. आता भारतीय संघ शनिवारी अंतिम सामना खेळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या