मुंबई : आज गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. एसआयपी, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अनेकजण चांगले रिटर्न्स मिळवतात. याच गुंतवणुकीच्या पर्यायात मुदत ठेव म्हणजेच Fixed Deposit (FD) हा पर्याय सर्वांत सुरक्षित मानला जातो. आजही अनेक गुंतवणूकदार एफटीच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर जास्त विश्वास ठेवतात. गुंतवणुकीचे अनेक पर्याय असूनही गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञही एफडी करण्याचा सल्ला देतात. एफडीच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला परताव्याची हमी मिळते. याच एफडीमध्ये तुमची पत्नी चांगलीच मदतीला येऊ शकते. तुम्ही करत असलेल्या एफडीमध्ये तुमच्या पत्नीची काय भूमिका असू शकते? तुमच्या पत्नीमुळे तुम्हाला मिळणारे रिटर्न्स कसे वाढू शकतात? हे जाणून घेऊ या... 


पत्नीच्या मदतीने टीडीएस वाचू शकतो


तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडी करता येते. एडीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला परताव्याची हमी दिली जाते. मात्र पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर मिळणारा परतावा हा करपात्र ठरतो. जेव्हा एफडीवर मिळणारे व्याज निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असते, तेव्हा टीडीएस कापला जातो. मात्र तुम्ही तुमच्या पत्नीच्या मदतीने हाच टीडीएस वाचवू शकता. 


पत्नीच्या मदतीने टीडीएस कसा वाचू शकतो? 


नियमानुसार  एवडीवरील होणारी कमाई वर्षाला 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर या कमाईवर तुम्हाला टीडीएस द्यावा लागतो. तुमचे उत्पन्न हे करपात्र असेल आणि तुमची पत्नी ही हाऊसवाईफ असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने एफडी करून टीडीएसरुपी द्यावी लागणारी रक्कम वाचवू शकता. गृहिणीला कर द्यावा लागत नाही. तुमची पत्नी लोअर टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असेल तरीदेखील तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी करून टीडीएस वाचवू शकता. हा टीडीएस वाचावायचा असेल तर मात्र पत्नीच्या नावे 15G फॉर्म भरावा लागेल. हवं तर तुम्ही पत्नीच्या नावे जॉइंट अकाउंट खोलू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीला फस्ट होर्ल्डर करावं लागेल. 


Form 15G चे नेमके काम काय?


साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीचे उत्पन्न हे करपात्र उत्पन्नापेक्षा कमी असेल तर टीडीएस कापला जाऊ नये म्हणून त्या व्यक्तीला Form 15G भरावा लागतो. फॉर्म 15G हा प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 197A मधील उपकलम 1 आणि 1(A) अंतर्गत येणारा डिक्लेरेशन फॉर्म आहे. या फॉर्मच्या मदतीने बँकांना तुमच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती मिळते. तुमचे उत्पन्न हे करपात्र नसेल आणि तुम्ही बँकेकडे फॉर्म 15G जमा केला तर बँक एफडीवर टीडीएस कापत नाही. 


हेही वाचा :


पीएफ काढताना फक्त 'या' चार गोष्टी करा, कधीच क्लेम रिजेक्ट होणार नाही!


सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला 1 लाख रुपये गुंतवल्यास काय फायदा होणार? मॅच्यूरिटीनंतर किती लाख मिळणार? आकडा वाचून थक्क व्हाल!