HSC Exam : आजपासून बारावीच्या परीक्षेला (12th Exam) सुरुवात झाली आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका (Answer Sheet) तपासण्यावर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची परीक्षेची लगबग सुरु असताना शिक्षकांनी मात्र आंदोलन पुकारलं आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाही, अशी भूमिका घेत विविध मागण्यांकरिता राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. वेतनवाढ, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार
शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने आणि त्याबाबत वारंवार आंदोलनं करूनही केवळ आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्याने, आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यार बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार बारावीच्या उत्तरपत्रिका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तपासणार नाहीत.
गेल्या वर्षी ही महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार टाकला होता. मात्र, काही मागण्या मान्य झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, अजूनही काही मागण्या पूर्ण न झाल्याने आता पुन्हा एकदा शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे.
वेतन आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन सुरू आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आंदोलनं करूनही केवळ आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कार आंदोलन करण्यात येणार असल्याची सूचना दिली होती. त्यानुसार, आता आजपासून सुरु होत असलेल्या बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तपासणार नाहीत. जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरणे, अनुदानातील जाचक अटी रद्द करणे, अशा विविध मागण्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाने ठेवल्या आहेत.
संपूर्ण राज्यात परीक्षा केंद्रवर चोख बंदोबस्त
महाराष्ट्राच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात या परीक्षेसाठी 24 हजार 309 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून जिल्ह्यातील 46 केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. पालघर जिल्ह्यातून 52 हजार 321 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून 62 परीक्षा केंद्र आणि 14 उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यवतमाळमध्ये यावर्षी इयत्ता बारावीच्या या परीक्षेला जिल्ह्यात 32 हजार 910 परीक्षार्थी बसले असून जिल्ह्यात 124 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI