First Investment Plan : साधारण पैसे कमवायला सुरुवात झाली की बरेचजण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. म्हणजे मोबाईल घेणं, एखादी बाईक घेणं त्यामुळे या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे पैसे आहेत ते पगारातून मिळणं शक्य असतं. परंतु, त्यानंतर जे पैसे आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लागणार आहेत. ते मात्र, या पगारातून मिळणं शक्य नसतं. जसं स्वत:चं घर, लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण, परदेशगमन आणि आपली निवृत्ती यासाठी खूप जास्त पैसा लागतो. म्हणून आपली पहिली गुंतवणूक कुठे करायची हा तुम्ही गुंतवणूक किती काळाकरता आणि तुमचं उद्दिष्ट काय यावर ठरतं. 


लक्षात घ्या, आपल्याला जी पहिली गुंतवणूक करायची तिची दिशा अर्थात आपल्याला येणाऱ्या काळातील गरजा जरी ठरवत असतील तरी गुंतवणूक ही केवळ एकदा करायची वस्तू नाही ती सातत्याने आपल्याला करावी लागते. जसं उत्पन्न आपल्याला मिळतं तशी गुंतवणूक आपण करत राहिली पाहिजे. या गुंतवणुकीसाठी आपण काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. 


आपण किती जोखीम घेऊ शकतो?


जेव्हा तुम्ही पीपीएफ किंवा एमपीएस सारखा विचार करता तेव्हा जोखीम कमी असते परंतु मिळणारा परतावाही कमी असू शकतो. तो महागाईवर मात करु शकत नाही. अशा वेळी तुम्हाला जास्त जोखीम पत्करुन इक्विटी म्युचल फंड किंवा थेट शेअर्स घेऊन तुम्हाला आपली गुंतवणूक करता येईल. 


शेअर्समध्ये गुंतवणूक करायच्या आधी कंपनीचा चांगला अभ्यास करा. ती कंपनी काय काम करते? येणाऱ्या काळात तिचे काय प्रॉडक्ट आहेत आणि कशा पद्धतीने तिचा मागचा परफॉर्मन्स आहे या सगळ्याचा विचार करुनच शेअर्समध्ये गुंतवणूक करा. 


वेगवेगळ्या गरजांप्रमाणे गुंतवणूक होऊ शकते. उदा..घर घ्यायचं असेल तर गृहकर्ज घेऊन स्वत:चं घर घेऊन त्या गृहकर्जाचे हफ्ते फेडणं हीसुद्धा एक गुंतवणूक होऊ शकते.


सोन्यात गुंतवणूक केल्याने फायदा की तोटा? 


सोन्याने आतापर्यंत गेल्या 100 वर्षांत जर बघितलं तर खूप जास्त परतावा दिलेला नाही. अशा वेळी सोन्यात गुंतवणूक करावी परंतु, केवळ आपल्या गरजेपुरती करावी. जवळपास 10 ते 15 टक्के इतकीच गुंतवणूक आपल्या संपत्तीच्या सोन्यात असली पाहिजे. बाकी सगळी गुंतवणूक आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंतवणुकीची साधनं आहेत त्यामध्ये विभागणी केली पाहिजे. जसं की, पीपीएफ, एनपीएस, बॉन्ड्स, बॅंकेचे फिक्स डिपॉझिटमध्ये इमर्जन्सी फंड आणि याच्या व्यतिरिक्त म्युचुअल फंड किंवा शेअर्स ही सगळी वेगवेगळी साधनं आहेत त्यामध्ये गुंतवणूक करावी. 


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या बातम्या : 


Share Market: शेअर बाजारात आजही तेजी, Sensex 390 अंकांनी तर Nifty 112 अंकांनी वधारला