Construction News : मागील वर्षी देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या बांधकामात (Construction) आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 मध्ये 4,35,045 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये दर तासाला सुमारे 50 घरे बांधली जात आहेत. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी ॲनारॉकने (ANAROCK) याबाबतची माहिती दिली आहे. चांगल्या विक्रीमुळे रिअल इस्टेट कंपन्यांच्या उलाढालीत मोठी सुधारणा झाली आहे. 


गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेटमध्ये खूप चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उच्च रेपो दर असूनही रिअल इस्टेट क्षेत्रात कोणतीही घसरण झालेली नाही. गृहकर्जाचे दर सध्या सर्वसामान्यांच्या मर्यादेत आहेत. दरम्यान, आकडेवारीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) गेल्या वर्षी 13 टक्के वाढीसह 143500  घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 2022 मध्ये हा आकडा 126720 युनिट होता. 2024 हे वर्षही खूप चांगले असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. 


कोणत्या शहरात किती घरांचे बांधकाम झाले?


ANAROCK च्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 4,35,045 घरांचे बांधकाम पूर्ण झाले, तर 2022 मध्ये 4.02 लाख घरे बांधण्यात आली.आकडेवारीनुसार, मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) गेल्या वर्षी 13 टक्के वाढीसह 143500  घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 2022 मध्ये हा आकडा 126720 युनिट होता.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र-दिल्ली (NCR) मध्ये, गेल्या वर्षी 32 टक्के वाढीसह 1,14,280 घरांचे बांधकाम पूर्ण झाले, तर 2022 मध्ये 86,300 घरे बांधण्यात आली. ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, 2023 मध्ये घरांच्या विक्रीने 2022 मधील उच्चांक ओलांडला आहे. 2024 मध्येही तो मजबूत राहण्याची शक्यता आहे. 
गेल्या वर्षी पुण्यात 65,000 घरांचे बांधकाम पूर्ण झाले, त्यात 23 टक्के घट झाली, तर 2022 मध्ये 84,200 घरे बांधण्यात आली. बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये गेल्या वर्षी 87,190 घरांचे बांधकाम पूर्ण झाले, तर 2022 मध्ये ही संख्या 81,580 युनिट्स होती. कोलकात्यात गेल्या वर्षी 25,075 घरांचे बांधकाम पूर्ण झाले, तर 2022 मध्ये 23,190 घरे बांधण्यात आली. 


दरम्यान, घरांच्या बांधकामाचा हा आकडा 2017 नंतरचा सर्वाधिक आहे. 2017 मध्ये 2,04,200 घरे, 2018 मध्ये 2,46,140 घरे, 2019 मध्ये 2,98,450 घरे, 2020 मध्ये 2,14,370 घरे, 2021 मध्ये 2,78,650 घरांचे बांधकाम पूर्ण झाले.


कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ


सिमेंट, लोखंड, आणि इतर कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं यापुढेही घरांच्या किंमती अजून वाढू होण्याची शक्यता आहे. एकूणच सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार होणाऱ्या परवडणाऱ्या घराचं स्वप्न महाग होण्याची शक्यता वर्तवली जातेय.


महत्वाच्या बातम्या:


Priyanka Chopra House : तब्बल 166 कोटी मोजून घेतलेला बंगला चक्क गळका निघाला! भडकलेल्या प्रियांका चोप्राने अखेर..