Holi 2024 Special News: रासायनिक रंग हे लोकांसाठी, पर्यावरणासाठी घातक असतात. त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं इको-फ्रेंडली आणि सेंद्रीय रंग वापरणं ही काळाची गरज आहे. होळीचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना रासायनिक रंगापासून दूर राहण्यासाठी काही स्टार्टअपने इको-फ्रेंडली रंग तयार करणे सुरु केलं आहे. ही स्टार्टअप सेंद्रीय रंग तयार करतात, यामुळं लोकांसह, प्राणी, पर्यावरणाला कोणताही धोका होत नाही. जाणून घेऊयात सेंद्रीय रंग तयार करणाऱ्या 5 स्टार्टअपबद्दल सविस्तर माहिती.
होळीचा सण जवळ आला आहे, त्यामुळं बाजारात विविध प्रकारचे रंग आले आहेत. मात्र, रासायनिक रंग त्वचेसाठी धोकादायक असतात. या रंगात विविध रसायने असतात. त्यामुळं त्याचा धोका असतो. मात्र, त्यामानाने सेंद्रीय रंगाचा कोणताही धोका नसतो. हे रंग आपण सहजरित्या वापरु शकतो.
Phool
Phool हे स्टार्टअप सेंद्रीय रंग तयार करणारं महत्वाचं स्टार्टअप आहे. हे स्टार्टअप फुलांशी संबधीत आहे. या स्टार्टअपचा मुख्य व्यवसाय हा फुलापासून अगरबत्ती बनवणे हा आहे. 2017 मध्ये या व्यवसायाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, सध्या Phool स्टार्टअप फुले, हळद, मैदा तसेच सुगंधी गुलालापासून रंग तयार करते. हा रंग तुमच्या त्वचेसाठी अजिबात हानीकारक नसतो. एवढंच नाहीतर चुकून हा रंग जर तुम्ही खाल्ला किंवा पोटात गेला तरी काही धोका होत नाही.
My Pooja Box
2017 मध्ये My Pooja Box हे स्टार्टअप सुरु करण्यात आलं होतं. या स्टार्टअपच्या माध्यमातून पुजेसाठी लागणारं साहित्य बनवले जाते. तसेच या माध्यमातून सेंद्रीय गुलाल देखील तयार केला जातो.
Maayer
Maayer या स्टार्टअपची सुरुवात गोव्यात करण्यात आली आहे. स्टार्टअप सेंद्रीय गुलाल तयार करण्याचे काम करते. तसेच होळीच्या सणाला विविध प्रकारचे सेंद्रीय रंग देखील यामाध्यमातून तयार केले जातात. फुले, तांदळाचे पीठ, औषधी वनस्पती आणि पाने वापरुन रंग केले जातात. पर्यावरणासाठी पूर्णत पोषक अशा प्रकारचे रंग या स्टार्टअपच्या माध्यमातून तयार केले जातात.
iTokri
iTokri या स्टार्टअपच्या माध्यमातून सेंद्रीय गुलाल तयार केला जातो. तसेच विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन सेंद्रीय रंग देखील तयार केला जातो. तसेच रंग करताना हळदीचाही वापर केला जातो. ग्वाल्हेरमध्ये या स्टार्टअपची 2012 मध्ये सुरुवात झाली होती. iTokri या स्टार्टअपनं तयार केलेले रंग लोकांसाठी अजिबात घातक नसतात. या रंगांचा त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. या स्टार्टअपचा मुख्य व्यवसाय हा हस्तकला वस्तू तयार करणे हा आहे.
निर्माल्य (Nirmalaya)
निर्माल्य स्टार्टअप 2019 मध्ये दिल्लीत सुरु करण्यात आले होते. हे स्टार्टअप होळी सणाला लोकांना सेंद्रीय खताचा पुरवठा करते. फुल आणि सेंद्रीय उत्पादने वापरुन हे स्टार्टअप रंग तयार करते. या रंगापासून लोकांना किंवा पर्यावरणाला कोणताही धोका पोहचत नाही.
महत्वाच्या बातम्या: