Chief Minister Medical Assistance Fund: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षान (Chief Minister Medical Assistance Fund) गेल्या 2 वर्ष 2 महिन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुर्धर आजारांनी पिडीत असलेल्या रुग्णांना (patients) या योजनेमधून तब्बल 321 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य (financial assistance) वितरित करण्यात आलं आहे. यामुळं 40 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे (Mangesh Chiwte) यांनी दिली आहे.
रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून मदत मिळवण्यासाठी ना वशिला - ना ओळख लागते. थेट मदत मिळते. हे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच नवं ब्रीद वाक्य झालं आहे. या योजनेत हॉस्पिटल अंगीकृत (Empanel) करण्याची आणि रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं. या योजनेतून जीवनदान मिळालेल्या
एक वर्षाच्या चिमुकलीची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडर पदी निवड
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील दुवा या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडर पदी निवड केली असल्याची माहितीही चिवटे यांनी दिली. संपूर्णता निःशुल्क असलेल्या या योजनेचा लाभ दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी घ्यावा असे आवाहन कक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे.