Hero MotoCorp Share : हिरो मोटोकाॅर्पचे अध्यक्ष आणि प्रवर्तक पवन मुंजाल यांच्यावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. आयकर विभागाने मुंजाल यांच्या निवासस्थानावर आणि कंपनी परिसरात छापे टाकले. त्यानंतर हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये जवळपास दोन टक्के घसरण झाली.
कंपनीने करचुकवेगिरी केला असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यातूनच चौकशीचा एक भाग म्हणून कंपनीचे अध्यक्ष मुंजाल आणि प्रवर्तक मुंजाल यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर पहाटेच्या सुमारास छापे टाकण्यात आले. कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारीदेखील आयकर विभागाच्या रडावर असल्याचे समजते. आयकर विभागाने आर्थिक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली.
आयकर विभागाने एअर चार्टर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो कॉर्प ग्रुपवर छापे टाकले असून सुमारे 36 ठिकाणी छापे टाकले. दिल्ली, नोएडा, गुरगाव, गाझियाबादमध्ये छापे टाकले आहेत. हिरो कॉर्प मुंजाल ब्रदर्सचे आहे. तर एअर चार्टर मनिंदर सिंग सेठी यांच्या मालकीचे आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हिरो मोटोकॉर्पच्या शेअर दरात 2 टक्क्यांनी घट झाली होती. हिरो मोटोकॉर्पचा शेअर 2373.50 रुपयांवर ट्रेंड करत होता.
हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी मोटरसायकल कंपनी आहे. भारताच्या हिरो सायकल आणि जपानच्या होंडा मोटरने संयुक्तपणे 1984 या कंपनीची स्थापना केली होती. भारतासह इतर देशांमधील मोटरसायकल बाजारपेठेत हिरो मोटोकॉर्पचा मोठा वाटा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Price Hike : मार्च महिन्यात सामान्यांना महागाईची झळ; इंधनांसह 'या' सहा वस्तूंची दरवाढ
- MDH Masala : भारतातील सर्वात प्रसिद्ध MDH मसाल्यांचे शेअर्स घसरले, कंपनीच विकायची आली वेळ
- फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha