HDFC Bank - HDFC Merger Impact : देशातील सर्वात मोठी हाउसिंग कंपनी HDFC आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी संचालक मंडळांने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संस्था, भागधारक, ग्राहक आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे संचालक मंडळाचे मत आहे. परंतु, विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच 2024 च्या अखेरीस या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.  


विलीनीकरणाच्या या प्रक्रियेनंतर एचडीएफसी आणि एफडीएफसी बँकेच्या ग्राहकांना एक प्रश्न असेल की, खात्यातील शिल्लक रकमेसह गृहकर्जाच्या खात्याचे काय होईल? परंतु, विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण स्थिती कायम राहणार आहे. याबरोबरच सध्याच्या पत्त्याच्या आधारे बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचचे वाटप करण्यात येणार आहे. 


विलीनीकरण होणार असले तरी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या ठेवीदारांना पूर्वीप्रमाणेच व्याज मिळणार आहे. परंतु, विलीनीकरणानंतर ठेवीदार किंवा कर्जदारांना एचडीएफसी बँकेने ठरवलेल्या व्याजावर परतावा किंवा कर्ज मिळणार आहे. सध्या एडीएफसी 33 महिन्यांच्या म्हणजे दोन वर्षे 9 महिन्यांच्या एफडी (FD) वर 6.05 ते 6.25 टक्के व्याजदर देते. तर HDFC बँक त्याच कालावधीसाठी 5.2 टक्के ते 5.7 टक्के व्याज देत आहे. 


एचडीएफसी ही हाउसिंग कंपनी गृह कर्जाच्या व्यवसायात आहे. परंतु, विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकांना रेपो दराच्या आधारे गृहकर्ज द्यावे लागते. त्यासाठी गृहनिर्माण वित्त कंपन्यांची कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. परंतु, स्पर्धेमुळे ते बँकांच्या व्याजदरांप्रमाणेच स्वस्त गृहकर्ज देतात. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरणानंतर नवीन  बँकिंग कंपनी असेल. त्यामुळे त्यावर फक्त आरबीआयचे नियम लागू होतील. त्यामुळे नवीन बँकिंग कंपनीच्या ग्राहकांना फक्त एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड रेटवरच कर्ज मिळणार आहे. 


महत्वाच्या बातम्या