GST Collection: फेब्रुवारी 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलनात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1,68,337 कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. जे 2023 मधील याच  महिन्याच्या तुलनेत 12.5 टक्के अधिक आहे.  देशांतर्गत व्यवहारांमुळं जीएसटीत झालेल्या 13.9 टक्के वाढीमुळं आणि वस्तूंच्या आयातीतून जीएसटीत 8.5 टक्के वाढ झाल्यामुळे जीएसटी महसूल वाढला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1.51 लाख कोटी रुपये आहे. ज्यात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.


आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन 1.67 लाख कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2022-23 पेक्षा 1.5 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकूण जीएसटी संकलन 18.40 लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. निव्वळ महसूल 1.51 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत 13.6 टक्क्यांनी अधिक आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्के वाढून 16.36 लाख कोटी रुपयांवर आला आहे. 


आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उत्तम सातत्यपूर्ण कामगिरी


फेब्रुवारी 2024 पर्यंत, चालू आर्थिक वर्षासाठी एकूण जीएसटी संकलन 18.40 लाख कोटी रुपये आहे. जे आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीतील संकलनापेक्षा 11.7 टक्के अधिक आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी सरासरी मासिक सकल संकलन 1.67 लाख कोटी रुपये आहे. जे मागील वर्षाच्या याच कालावधीत संकलित 1.5 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी 2024 पर्यंत परताव्यानंतर जीएसटी महसूल 16.36 लाख कोटी रुपये आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.0 टक्के अधिक आहे. एकूणच, जीएसटी महसुलाचे आकडे सातत्यपूर्ण  वाढीचा वेग आणि सकारात्मक कामगिरी दर्शवतात.


फेब्रुवारी 2024 मधील संकलनाचे वर्गीकरण 


केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी): 31,785 कोटी रुपये
राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी): 39,615 कोटी रुपये
एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी): 84,098 कोटी रुपये, ज्यात आयात वस्तूंवर संकलित 38,593 कोटी रुपयांचा समावेश आहे.
उपकर: 12,839 कोटी रुपये, ज्यात आयात वस्तूंवर संकलित 984 कोटींचा समावेश आहे.
आंतर-सरकारी निपटारा : केंद्र सरकारने संकलित आयजीएसटी मधून 41,856 कोटी रुपये सीजीएसटी आणि 35,953 कोटी रुपये एसजीएसटी स्वरूपात दिले आहेत. या नियमित निपटाऱ्यानंतर सीजीएसटी महसूल 73,641 कोटी रुपये आणि एसजीएसटी महसूल 75,569 कोटी रुपये इतका आहे.


महत्वाच्या बातम्या:


आजपासून GST ते LPG 'हे' 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर ताण पडणार का?