Adani Group : अदानी समूह (Adani Group) गुजरातमधील (Gujrat) वाळवंट परिसरात जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क (Green energy park) बनवत आहे. हे ग्रीन एनर्जी पार्क गुजरातच्या कच्छच्या रणमध्ये होत आहे. 726 चौरस किमीमध्ये हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2 कोटींहून अधिक घरांना वीज देण्यात येणार आहे. खुद्द गौतम अदानी (Gautam adani) यांनी त्यांच्या ट्वीटरवर ग्रीन एनर्जी पार्कमध्ये सुरु असलेल्या कामाची छायाचित्रे शेअर केली आहेत. अदानी समूहाच्या या प्रकल्पामुळं भारताची हरित ऊर्जेची क्षमता वाढणार आहे. याशिवाय COP मध्ये केलेल्या हवामान वचनांची पूर्तता करण्यातही मदत होईल.
अदानी समूह गुजरातमधील कच्छच्या रणमध्ये जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क बनवत आहे. हे उद्यान 2 कोटींहून अधिक घरांना वीज देण्यासाठी 30 GW वीज तयार करणार आहे. यामुळं अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स शेअर बाजारात सातत्याने वेगाने व्यवहार करत आहेत.
काय म्हणाले गौतम अदानी
आम्ही जगातील सर्वात मोठे हरित ऊर्जा उद्यान उभारत असल्याचे उद्योगपती गौतम अदानी म्हणाले. भारताच्या अक्षय ऊर्जेतील प्रभावी प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आम्हाला अभिमान आहे. कच्छच्या वाळवंटात 726 चौरस किमीवर पसरलेला हा प्रकल्प अवकाशातूनही दिसतो. 2 कोटींहून अधिक घरांना वीज देण्यासाठी आम्ही 30 GW निर्माण करणार असल्याची माहिती गौतम अदानी यांनी दिली. दरम्यान, अदानी समूहाच्या या प्रकल्पामुळं भारताची हरित ऊर्जेची क्षमता वाढणार आहे.
दानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये वाढ
2030 पर्यंत, भारत आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता 45 टक्क्यांपेक्षा जास्त कमी करेल. तसेच 2070 पर्यंत भारत ‘नेट झिरो’चे लक्ष्य गाठेल. अदानी ग्रीन एनर्जी सौर, पवन आणि संकरित अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहे. सध्या कंपनीकडे 8.4 GW एवढी अक्षय उर्जा क्षमता आहे. ही देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 5.70 टक्क्यांच्या घसरणीसह 1533.00 रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, संपूर्ण ट्रेडिंग आठवड्यात, अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 15-20 टक्क्यांची वरची सर्किट दिसून आली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 2,185.30 रुपयांवर होता पण 28 फेब्रुवारीला तो 439.35 रुपयांवर आला. मात्र, त्यानंतर त्याची किंमत जवळपास तीन पटीने वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: