Flipkart Big Year-End Sale 2023 : फ्लिपकार्टचा वर्षातील शेवटचा फ्लिपकार्ट (Flipkart Big Year-End Sale) बिग इयर एंड सेल 2023 लवकरच सुरू होणार आहे. 9  डिसेंबरपासून सुरू होणारा हा सेल 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने सेलची तारीख जाहीर केली आहे. यावर्षी तुम्हाला काही उत्पादनांवर 50 ते 80 टक्के सूट मिळू शकते. या सेलमध्ये अनेक बँक कार्डवर त्वरित सूट देणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा च्या कार्डचा वापर करून 10% इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. चला जाणून घेऊया...



फ्लिपकार्ट बिग इयर एंड सेल 2023 Mobile Offers : मोबाइल ऑफर्स


फ्लिपकार्ट बिग इयर एंड सेलमध्ये सर्वांच्या नजरा आयफोन्सवर असणार आहेत. यावेळी आयफोन 14 वर जोरदार सूट मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सॅमसंग, वनप्लस, विवो, ओप्पो सारख्या फोनवरही मोठी सूट पाहायला मिळणार आहे. 


Laptos Offers : लॅपटॉप डील्स


फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, लॅपटॉपवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. ही सवलत सर्व प्रमुख लॅपटॉप ब्रँड्सना लागू असेल. त्यामुळे जर बजेट असेल आणि चांगला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ही संधी अजिबात सोडू नका.


Flipkart Big Year-End Sale 2023: स्मार्टवॉच ऑफर्स


हेडफोन आणि स्मार्टवॉच हा मोठा सेगमेंट आहे ज्याला जास्त मागणी आहे.  इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. ही सवलत सर्व प्रमुख हेडफोन ब्रँड्सना लागू असेल.


TV Offers :  टीव्हीवरही ऑफर


सेलमधून तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळत आहेत. थॉमसन टीव्ही सेलमध्ये 5,999 रुपयात उपलब्ध आहे. कंपनी 43 इंच आणि 55 इंच स्क्रीन साइजमध्ये टीव्ही देखील ऑफर देत आहे. त्यामुळे तुमचा जर टीव्ही घ्यायचा विचार असेल आणि तुम्ही चांगल्या ऑफर्सची वाट बघत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठीच आहे असं समजा. 


इतर महत्वाची बातमी-



Google Playstore Delete 17 apps :   गूगल प्लेस्टोरने हटवले 'हे' 17 Apps; तुम्हीही 'या' Apps वापरत करत होता? आताच चेक करा!

Facebook And Instagram Cross Communication Chats : फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं 'हे' फिचर बंद होणार; मेटा कंपनीची मोठी घोषणा