मुंबई : केंद्र सरकारनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 10 हजार कोटींचा फंड उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसी बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांचा त्यामध्ये समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बँका 2025 च्या चौथ्या तिमाहीत छोट्या हप्त्यांमध्ये रक्कम उभी करु शकतात.
2026 पर्यंत सरकारची भागिदारी कमी होणार
सीएनबीसी -टीव्ही 18 नं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन विभागानं ऑफर फॉर सेलद्वारे या बँकांमधील हिस्सेदारी विकण्याची ऑर्डर मिळाली आहे. सरकार ऑगस्ट 2026 मध्ये पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील भागिदारी 25 टक्क्यांपर्यंत कमी केली जाणार आहे. त्यामुळं या बँकांमधील सरकारची भागिदारी 2026 पर्यंत 25 टक्क्यांपर्यंत येईल. या बँका वित्तीय सेवा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणात आहेत.
सरकारची या बँकांमध्ये भागिदारी किती?
बीएसईवरील फायलिंगनुसार डिसेंबरला संपलेल्या तिमाहीच्या शेवटी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सरकारची भागिदारी 79.6 टक्के आहे. पंजाब अँड सिंध बँकेत 98.25 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकेत 96.38 टक्के, यूको बँकेत 95.39 टक्के आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियात 93.08 टक्के भागिदारी सरकारकडे आहे. सध्याच्या शेअरच्या मूल्यानुसार पाच बँकांमध्ये सरकारची अतिरिक्त भागिदारी जवळपास 50000 हजार कोटी रुपयांची आहे.
या बँकांच्या शेअरमध्ये तेजी
या आठवड्यात सोमवारी शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड होता. गुंतवणूकदारांचे 12.61 लाख कोटी रुपये सोमवारी बुडाले होते. मंगळवारी मात्र भारतीय शेअर बाजारात वेगळं चित्र पाहायला मिळालं. यूको बँकेचा शेअर 15 टक्क्यांनी वाढून 44.32 रुपयांवर पोहोचला. इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर 19.24 टक्क्यांनी वाढून 54.11 रुपयांवर बंद झाला. सेंट्रल बँकेच्या शेअरमध्ये 18.36 टक्के तेजी पाहायला मिळाली. या बँकेचा शेअर 55.51 रुपयावंर बंद झाला. बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर 52.77 रुपयांवर बंद झाला. पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर 48.30 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये 14.67 टक्के तेजी पाहायला मिळाली.
इतर बातम्या :
State Bank : स्टेट बँकेची हर घर लखपती योजना बनवेल करोडपती, 593 रुपयांपासून गुंतवणुकीची संधी