Inflation: टोमॅटो आणि भाज्यांच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे (Inflation Hike) हैराण झालेल्या सर्वसामान्यांना येत्या काही दिवसांत दिलासा देणारी बातमी मिळू शकते. आता, सणासुदीला सुरुवात होणार असून त्याआधी ही दिलासादायक बातमी मिळू शकते. येत्या काही दिवसांत तूप (Ghee) आणि लोणीच्या (Butter) दरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात या दोन्ही पदार्थांचा वापर केला जातो.


आता किती आहे कर? (GST on Ghee Butter)


तूप आणि लोणीवरील जीएसटी (GST) कमी करण्याचा प्रस्ताव सरकार मांडणार आहे. 'मिंट' या वृत्तपत्राने दिलेल्या एका बातमीनुसार, सरकार लवकरच असा प्रस्ताव आणू शकते. सध्या तूप आणि लोणी या दोन्ही पदार्थांवर 12-12 टक्के दराने जीएसटी आकारला जातो. केंद्र सरकार हा जीएसटी कर 5-5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देऊ शकते.


कर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. देशात लवकरच सण-उत्सव सुरू होणार आहेत. साधारणपणे डिसेंबरपर्यंत सण-उत्सवाचे वातावरण असते. सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात विविध प्रकारच्या मिठाई आणि खाद्यपदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये तूप आणि लोणीचा भरपूर वापर केला जातो. त्यामुळे  त्यांच्या किमती कमी झाल्या तर सर्वसामान्यांना सणांचा आनंद वाढेल.


महागाईने त्रस्त सामान्य माणूस


सर्वसामान्य जनता आधीच महागाईने त्रस्त आहे. किरकोळ महागाईचा दर सुमारे दीड वर्षे उच्च राहिला आहे. महागाई आटोक्यात येण्यास सुरुवात झाली असतानाच टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव भडकले. दुसरीकडे दुधाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या एका वर्षात दूध 10.1 टक्क्यांनी आणि तीन वर्षांत 21.9 टक्क्यांनी महागले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेटही बिघडले आहे. अशा स्थितीत ऐन सणांच्या काळात तूप आणि लोणीचे दर कमी झाल्यास अनेकांना दिलासा मिळू शकतो. 


या विभागाने दिलाय प्रस्ताव


'मिंट'च्या वृत्तानुसार, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने तूप आणि लोण्यावरील जीएसटी कमी करण्याची विनंती केली आहे. विभागाने अर्थ मंत्रालयाला यासंबंधीचा प्रस्ताव जीएसटी फिटमेंट समितीसमोर ठेवण्यास सांगितले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव GST कौन्सिलसमोर ठेवला जाऊ शकतो. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कराबाबतचा निर्णय घेतला जातो. 


ऑनलाईन गेमिंग महागलं, 28 टक्के जीएसटी लागू, कॅन्सरचे औषध स्वस्त होणार


जीएसटी परिषदेच्या (GST Council Meeting) आज झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ऑनलाईन गेमिंग (Online Gaming), हॉर्स रेसिंग (Horse Racing) आणि कॅसिनोवर (Casinos) 28 टक्के जीएसटी लागू होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 


जीएसटी कौन्सिलने सिनेमाच्या तिकिटांसह पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्ससारख्या खाद्यपदार्थांवर जीएसटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता या सर्व गोष्टी कॉम्पोझिट सप्लाय म्हणून गणल्या जाणार आहेत. त्यामुळे सिनेमाच्या तिकीटाप्रमाणेच कर आकारला जाणार आहे. याचाच अर्थ सिनेमागृहातील रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यावर आता 5 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यापूर्वी 18 टक्के जीएसटी लागू होता. जीएसटी कौन्सिलने अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेलाही मान्यता दिली आहे. 


जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील (Cancer Medicine) औषधांच्या आयातीवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विशेष औषधांसाठी औषध आणि अन्नावरील IGST ही रद्द करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) या निर्णयामुळे कॅन्सरवरील औषध Dintuvximab ची आयात स्वस्त होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: