मुंबई : एखाद्या प्रश्नाचे उत्तर असो वा कोणती अडचण असो, आपण त्याचे उत्तर थेट गुगलवर शोधतो. सर्व माहिती पुरवणारे एकमेव स्थान म्हणजे गुगल असं सर्रास म्हटलं जातं. याच गुगलची अल्फाबेट ही पालक कंपनी आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार करत आहे. या कराराच्या माध्यमातून अल्फाबेट सायबर सुरक्षा क्षेत्रातील वीज (Vij) या स्टार्टअप कंपनीला खरेदी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा खरेदी करार तब्बल 23 अब्ज डॉलर्सला होणार आहे. हा करार पूर्ण झाल्यास गुगलने आतापर्यंत केलेला हा सर्वांत मोठा खरेदी करार असेल.
लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने या कराराबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार अल्फाबेटकडून 23 अब्ज डॉलर्समध्ये विज ही कंपनी करेदी केली जात आहे. त्यासाठीचा हा करार अंतिम टप्प्यात आहे. हा खरेदी करार पूर्ण झाल्यावर त्याविषयीची अधिकृत घोषणा होऊ शकते.
विज कंपनी नेमकं काय करते?
विज ही एक सायबर सुरक्षा क्षेत्रातील एक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात इस्रायलमध्ये झाली होती. या कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. ही कंपनी क्लाऊड बेस्ड सायबर सुरक्षा प्रदान करते. गेल्या काही वर्षांत या कंपनीने चांगली प्रगती केली असून मॉर्गन स्टेनली, डॉक्यूसाईन आदी दिग्गज कंपन्या वीज या कंपनीच्या ग्राहक आहेत. माइक्रोसॉफ्ट आणि अॅमोझॉन अशा दिग्गज क्लाऊड सेवा प्रोव्हायर कंपन्यासोबतही या कंपनीची भागिदारी आहे.
विज कंपनीचा अनेक देशांत व्यापार
विज ही कंपनी जगभरात अनेक देशांत पसरलेली आहे. अमेरिका, युरोप, आशिया, इस्रायलमध्ये या कंपनीचे 900 कर्मचारी आहेत. या वर्षी ही कंपनी आणखी 400 कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्याच्या विचारात आहे. सायबर धोक्यांना ओळखण्यासाठी या कंपनीकडून आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. 2023 मध्ये या कंपनीचे
याआधी दशकभरापूर्वी झालेला अशा प्रकारचा करार
विज या कंपनीला खरेदी करून गुगल नवा इतिहास रचण्याच्या तयारी आहे. कारण गुगलचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा करार आहे. गेल्या दशकभरापासून अशा प्रकारचा मोठा करार गुगलने केलेला नाही. याआधी गुगलने मोठा करार करू मोटोरोलो मोबिलिटीला खरेदी केले होते. हा करार 2012 साली झाला होता. या कराराअंतर्गत गुगलने 12.5 अब्ज डॉलर्स खर्च केले होते. या करारात गुगलला दुर्दैवाने तोटा झाला. नंतर मोटोरोला मोबिलिटी ही कंपनी गुगलने अवघ्या 2.91 अब्ज डॉलर्सना विकली होती.
हेही वाचा :
गुंतवणुकीतही सचिन तेंडुलकरचा सिक्सर! 'या' कंपनीत लावलेले पैसे झाले चार पट; मिळाले कोट्यवधी रिटर्न्स
श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्यूला, जाणून घ्या काय आहे 15-15-15 सूत्र?
Free Tablet Scheme : केंद्र सरकारकडून खरंच मोफत टॅब्लेट दिले जात आहेत? जाणून घ्या सत्य काय?