मुंबई : प्रत्येकालाच श्रीमंत व्हावं वाटतं. त्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. जगभरातलं सुखाने पायाशी लोळण घ्यावी यासाठी अनेकजणे वेगवेगळे उद्योग, व्यवसाय, नोकरी करत असतात. पण योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यावरही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. ज्या ठिकाणी चांगले रिटर्न्स मिळतात, त्या ठिकाणीच पैसे गुंतवायला हवेत. सध्या अशाच श्रीमंत होण्याच्या खास फॉर्म्यूल्याची चर्चा होत आहे.
15-15-15 फॉर्म्यूल्याने मिळेल चांगला परतावा
तुम्ही म्युच्यूअल फंडाच्या मदतीने 15-15-15 हा फॉर्म्यूला वापरून चांगले पैसे कमवू शकता. या फॉर्म्यूल्याचा वापर करून तसेच शिस्तबद्ध पद्धतीने पैसे गुंतवून तुम्ही म्युच्यूअल फंडातून चांगले पैसे कमवू शकता. 15-15-15 या फॉर्म्यूल्याचा अर्थ तसा साधा आणि सरळ आहे. म्युच्यूअल फंडात केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरले जाते. 15 टक्के परताव्याचा ठोस दावा केला जाऊ शकत नाही. पण तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर म्युच्यूअल फंडात 15 टक्के रिटर्न्स मिळतात असे गृहित धरले जाते. यामध्ये बदल होऊ शकतो.
15-15-15 चा फॉर्म्यूला नेमका काय आहे?
तुम्हाला प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये गुंतवायचे असतील असे गृहीत धरुया. त्यानंतर 15-15-15 या फॉर्म्यूल्यातील पहिल्या 15 या अंकाचा अर्थ हा15 वर्षांसाठी गुंतवणूक करायची. दुसऱ्या 15 आकड्याचा अर्थ हा तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात असे समजावे. त्यानंतर तिसऱ्या 15 चा अर्थ तुम्ही प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये गुंतवायचे. असे केल्यास तुमच्याजवळ 15 वर्षांत 1 कोटी भांडवल जमा होईल.
चक्रवाढ व्याज म्हणजे काय?
म्युच्यूअल फंडात तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळते. त्यामुळे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुमचा चांगला फायदा होऊ शकतो. चक्रवाढ व्याज कसे काम करते हे समजून घेण्यासाठी तुम्ही प्रत्येक महिन्याला मुच्यूअल फंडात 15 हजार रुपयांची गुंतवणूक करत आहात. तसेच तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला 15 टक्क्यांनी रिटर्न्स आले, असे गृहीत धरुया. या गृहितकाने तुम्ही गुंतवलेल्या 15 हजार रुपयांवर पहिल्या महिन्यात 187 रुपये व्याज मिळेल. त्यानंतर पुढच्या महिन्यात तुम्ही आणखी 15 हजार रुपये गुंतवल्यास तुमची एकूण गुंतवणूक रक्कम ही 30 हजार होईल. या महिन्यात तुम्हाला फक्त 30 हजारच नव्हे, तर तुम्ही कमवलेल्या 187 रुपयांच्या व्याजावरही व्याज मिळेल. म्हणजेच तुम्ही जमा केलेली रक्कम आणि तुम्हाला मिळालेले व्याज यावरही तुम्हाला व्याज मिळेल. याच कारणामुळे चक्रवाढ व्याजाचा गुंतवणूकदारांना फायदा होतो.
15-15-15 फॉर्म्यूल्याने तुम्हाला किती रुपये मिळणार?
वर नमूद केल्याप्रमाणे तुम्ही 15 वर्षांसाठी 15 हजार रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुमचे एकूण 27 लाख रुपये जमा होतील. या जमा रकमेवर तुम्हाला एकूण 73 लाख रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला 15 वर्षांनी एकूण तब्बल 1,00,27,601 कोटी रुपये मिळतील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
Free Tablet Scheme : केंद्र सरकारकडून खरंच मोफत टॅब्लेट दिले जात आहेत? जाणून घ्या सत्य काय?
गुंतवणुकीतही सचिन तेंडुलकरचा सिक्सर! 'या' कंपनीत लावलेले पैसे झाले चार पट; मिळाले कोट्यवधी रिटर्न्स
काय सांगता, आता सोन्याचा संपूर्ण देशात एकच भाव? लवकरच होणार मोठा बदल!