Google Job News : सध्या सोशल मीडियावर टेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी गुगलची (Google) जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, गुगलने नोकरी (Job) सोडून गेलेल्या एका कर्मचाऱ्याला भरगच्च पगार देऊन पुन्हा कामावर घेतले आहे. या कर्मचाऱ्याला कंपनीने तब्बल 22,000 कोटी रुपयांचा पगार दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Ai) जीनियस म्हटल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव नोम शजिर (Noam Shajir) आहे. 


नोम शजिरने का सोडली होती गुगलमधील नोकरी?


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नोम शजिरने (Noam Shajir) गुगलवर (Google) रागावून नोकरीचा राजीनामा दिला होता. आता गुगलने त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी तब्बल 2.7 बिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 22 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. त्यामुळं हा काम सोडून गेलेला कर्मचारी पुन्हा गुगलमध्ये रुजू होणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर  असलेल्या नोम शजिरने 2000 साली गुगलमध्ये नोकरीला सुरुवात केली होती. जवळपास 20-21 वर्षे कंपनीत काम केल्यानंतर नोमने 2021 मध्ये कंपनीला राम-राम ठोकला. 2017 मध्ये नोमने मीना नावाचा एक अतिशय प्रगत चॅटबॉट विकसित केला होता. नोमने Google कडे चॅटबॉट जारी करण्याची विनंती केली होती, पण कंपनीने ती नाकरली. याचाच राग मनात धरुन त्याने कंपनी सोडली आणि मित्र डॅनियल डी फ्रेटाससोबत Character.AI नावाचा नवीन स्टार्टअप सुरू केले होते.  


नोम शजिरची Character.AI ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात चांगलं काम करणाऱ्या स्टार्टअप्सपैकी एक बनली आहे.  दरम्यान, आता Google ने त्यांचे AI युनिट DeepMind मध्ये सामील करण्याची घोषणा केली आहे. यासाठी नोम शजिरच्या Character.AI चे तंत्रज्ञान कामी येणार असल्यामुळे गुगलने शजिरला परत कंपनीत काम करण्याची ऑफर दिली. यासाठी कंपनी नोमला तब्बल 22,000 कोटी देणार आहे. 


नोम शजिरचे Google मध्ये नेमकं काय काम असणार?


नोम शजिर आता पुन्हा Google सोबत काम करणार आहे. पण सर्वांना प्रश्न पडला असेल की शजिर आता नेमकं काय काम करणार? तर Google मध्ये परतल्यानंतर शजिर कंपनीच्या Gemini Ai चे पुढील व्हर्जन तयार करणाऱ्या टीमचे नेतृत्व करेल. OpenAI च्या ChatGPT सारख्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी Google ने Gemini AI तयार केले आहे. आता शजिर याचे नेतृ्त्व करणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


Jobs in Google : सॉफ्टवेअर इंजिनिअर्सला गुगलमध्ये इंटर्नशिपची संधी, लाखों रुपयांचा स्टायपेंड मिळणार, अर्ज कुठं करायचा?