Jobs in Hospitality : कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचाही अनेक देशांवर परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये मंदी आली आहे. अशातच आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धानं नवे संकट निर्माण केले आहे. तसेच गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांमध्ये कपात झाली आहे. अशात कोरोनाच्या काळानंतर पर्यटन क्षेत्र वेगानं वाढलं आहे. त्यामध्ये नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी असून, येत्या काळात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 


कोविड महामारीनंतर पर्यटन क्षेत्र तेजीत आहे. भारतातील प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगातून पुढील काही महिन्यांत रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या महिनाभरात या क्षेत्रात 70 ते 80 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सणासुदीच्या काळात प्रवासात वाढ झाल्यामुळं आणि कोविडनंतर प्रवासी क्षेत्र गजबजले असल्यानं रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.


70 ते 80 हजार रोजगाराच्या संधी


स्टाफिंग कंपनी टीमलीजच्या मते, सणासुदीच्या काळात प्रवासाची मागणी झपाट्याने वाढली आहे. यासोबतच क्रिकेट वर्ल्ड कपमुळं मोठ्या प्रमाणात प्रवासाची मागणीही वाढत आहे. यावेळी भारतातील विविध शहरांमध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. देशातील प्रमुख 10 शहरांमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे. टीमलीजचा अंदाज आहे की यामुळं येत्या महिन्यात 70,000 ते 80,000 नोकरीच्या संधी निर्माण होतील.


हॉटेल बुकिंग वाढले


कोविडनंतर हे पहिलेच वर्ष आहे की, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल बुकिंग होत आहे. येत्या सणासुदीच्या काळात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, हे कोविड नंतरचे पहिले वर्ष आहे की ज्यामध्ये हॉटेलचा व्याप वाढत आहे. ITC-समर्थित फॉर्च्यून हॉटेल्स, लेमन ट्री हॉटेल्स आणि इतर अनेक मोठ्या आणि मध्यम आकाराची हॉटेल्स मागणी पूर्ण करण्यासाठी लहान आणि नॉन-ब्रँडेड हॉटेल्स घेत आहेत.


कोणत्या पदासाठी संधी मिळेल?


या क्षेत्रातील प्रमुख भूमिकांबद्दल बोलताना, हॉस्पिटॅलिटी मॅनेजर, इव्हेंट प्लॅनर आणि कोऑर्डिनेटर, रेस्टॉरंट स्टाफ, लॉजिस्टिक मॅनेजर आणि ड्रायव्हर्स यासारख्या पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगात नोकरीसाठी मोठा वाव आहे. येत्या महिनाभरात या क्षेत्रात 70 ते 80 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Mumbai Police Recruitment: मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार, गृह खात्याचा निर्णय