Layoff: यंदाच्या वर्षातील जगातील मोठी कर्मचारी कपात, 'या' कंपनीत 70 टक्के मनुष्यबळ कमी होणार!
वाढत्या महागाईने जगभरात आर्थिक मंदीची गडद छाया पडू लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिक मंदी येण्याआधीच अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरू केली आहे.
मागील वर्षी अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर यावर्षीही कर्मचारी कपात सुरू आहे.
जगातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनकडून आता मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे.
अॅमेझॉन आपल्या 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांनी ही माहिती दिली.
18 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे अॅमेझॉनमधून जवळपास 70 टक्के नोकऱ्या, मनुष्यबळ कमी होणार असल्याचा अंदाज आहे.
अॅमेझॉनने ही नोकरकपात केली तर कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कॉस्ट कटिंग असेल.
अनेक बड्या कंपन्यांनी नोकरकपात करत कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षीदेखील मायक्रोसॉफ्ट, ट्वीटर, मेटा या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात झाली होती.
त्याशिवाय, बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या पेप्सीको मध्ये कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे.