मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात कमी अधिक चढ-उतार सुरुच आहे. गुरुवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. आज मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,880 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,880 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 71,400 रुपये इतका आहे.
गेल्या काही दिवसांचा विचार करता सोन्याचे भाव हे बदलत आहेत. 1 जून रोजी सोन्याचा भाव हा 47,900 रुपये इतका होता. 2 जून रोजी त्यामध्ये 1330 रुपयांची वाढ झाली आणि तो 49,230 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर सोन्याच्या भावात कमी अधिक चढ-उतार पहायला मिळाले. दोन दिवस सोन्याचा भाव स्थिर राहिल्यानंतर आता पुन्हा त्यात 200 रुपयांची वाढ झाली आहे आणि ते 48,880 रुपयांवर पोहोचलं आहे.
बुधवारी चांदीचा दर हा 71,700 रुपये इतका होता. गुरुवारी त्यामध्ये 300 रुपयांची घसरण होऊन ती किंमत 71,400 रुपयांवर पोहोचली होती. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 1 जून रोजी चांदीचा भाव हा 72,600 रुपये इतका होता. नंतर त्यामध्ये कमी अधिक चढ उतार होत राहिली. मंगळवारी चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ झाली होती. मंगळवारी चांदीचा दर हा 71,700 इतका होता. तर बुधवारी तो दर 71,400 रुपये इतका होता. आज त्यात कोणताही बदल झाला नाही.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास नऊ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- शासनाचे गोंडवाना विद्यापीठाकडे दुर्लक्ष; नियुक्ती प्रक्रिया घेतल्यानंतरही कुलगुरूंची निवड रखडलेलीच
- लसीकरण वेगाने पूर्ण करणाऱ्या देवळी-पुलगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतीना पाच लाखांचा निधी : आमदार रणजित कांबळे
- Thane Crime : मोबाईल चोरट्यामुळे महिलेने गमावला जीव; ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल